Video : “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं”, खासदार कृपाल तुमाणे यांची इच्छा

| Updated on: Jul 09, 2022 | 1:54 PM

तुम्ही शिंदे गटात जाणार का या प्रश्नावर त्यांनी नो कमेंट्स असं म्हणत उत्तर देणं टाळलं.

Video : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, खासदार कृपाल तुमाणे यांची इच्छा
Follow us on

मुंबई :उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकत्र यावं. योग्य निर्णय व्हावा. त्यांनी एकत्र यायलाच हवं जेणे करून शिवसैनिकांमधील संभ्रम दूर होईल. आपण शिवसेना सोडलेली नाही, आपण शिवसैनिकच असलेयाचं एकनाथ शिंदे यांनी सांगतलं आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावं “, असं शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे (Krupal Tumane) यांनी म्हटलंय. कृपाल तुमाणे यांची पुढची भूमिका काय असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. शिवाय तुम्ही शिंदे गटात जाणार का या प्रश्नावर त्यांनी नो कमेंट्स असं म्हणत उत्तर देणं टाळलं. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या बातमीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“ठाकरे शिंदेंनी एकत्र यावं”

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. योग्य निर्णय व्हावा. त्यांनी एकत्र यायलाच हवं जेणे करून शिवसैनिकांमधील संभ्रम दूर होईल. आपण शिवसेना सोडलेली नाही, आपण शिवसैनिकच असलेयाचं एकनाथ शिंदे यांनी सांगतलं आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावं “, असं कृपाल तुमाणे यांनी म्हटलंय.

शिंदे गटासोबत जाणार का?

तुम्ही शिंदे गटात जाणार का या प्रश्नावर त्यांनी नो कमेंट्स असं म्हणत उत्तर देणं टाळलं.

शिवसेना खासदारांची काल बैठक?

कृपाल तुमाणे यांच्या दिल्लीतील घरी शिवसेनेच्या दहा खासदारांची बैठक झाली असल्याची कालपासून चर्चा आहे. त्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा मी कालपासून नागपूरलाच आहे. त्यामुळे मी नसताना दिल्लीतील घरी बैठक होण्याचा प्रश्नच नाही, असं तुमाणे म्हणालेत.

भावना गवळींना गटनेते पदावरून हटवण्यात आलं. त्यांच्यावर झालेल्या कारवाईविषयी त्यांना विचारण्यात आलं तेव्हा तुमाणे यांनी तो विषय वेगळा असल्याचं म्हटलंय. खासदारांचा एक गट एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या तयारीत आहे का असं विचारण्यात आलं तेव्हा असं काहीच नसल्याचं तुमाणे म्हणालेत.