
मुंबई : आज सेना खासदारांची बाठक पार पडतेय. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. खासदार राहूल शेवाळे, राजेंद्र गावित आणि इतर काही खासदार द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा देण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय. हिंदुत्वाचा धागा पकडत पुन्हा भाजपशी जवळीक करावी, अशी या सेना खासदारांची भावना आहे. सेना खासदारांचा मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेना पाठिंबा देणार का? हाच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.
आज सेना खासदारांची बाठक पार पडतेय. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. खासदार राहूल शेवाळे, राजेंद्र गावित आणि इतर काही खासदार द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा देण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेना पाठिंबा देणार का? हाच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.
भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय असा प्रश्न अनेकांना पडला. तर द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. सामान्य आदिवासी महिला ते राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म 20 जून 1958 ला ओडिसामधल्या मयूरभंज जिल्ह्यात झाला.कुटुंबातील आर्थिक चणचणीमुळे लहानपणी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्या उर्जा खात्यात कनिष्ठ अधिकारी म्हणून सहभागी झाल्या. पुढे त्यांना झारखंडच्या राज्यपालपदी बसण्याची संधी मिळाली. अन् आता भाजपने त्यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे.