काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची नांदी, अध्यक्षासोबत चार कार्यकारी अध्यक्ष : सूत्र

| Updated on: May 26, 2019 | 1:51 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सपाटून मार खाल्ल्यानंतर, काँग्रेस पक्षात मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला असताना, काँग्रेस कार्यकारिणी समितीने राहुल गांधींचा राजीनामा नाकारला. मात्र, त्यानंतरी काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत मोठ्या पदांसाठी […]

काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची नांदी, अध्यक्षासोबत चार कार्यकारी अध्यक्ष : सूत्र
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सपाटून मार खाल्ल्यानंतर, काँग्रेस पक्षात मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला असताना, काँग्रेस कार्यकारिणी समितीने राहुल गांधींचा राजीनामा नाकारला. मात्र, त्यानंतरी काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत मोठ्या पदांसाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षांसोबत चार कार्यकारी अध्यक्ष असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि दक्षिण भारतातील एका नेत्याचा समावेश असेल, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला 352, काँग्रेसप्रणित यूपीएला 87 आणि इतरांना 103 जागा मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2019 च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या हाती अपयश आलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता वर्तवण्यात आली. त्याप्रमाणे काँग्रेस अध्यक्षच बदलण्याची शक्यता दिसत असताना, काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने नाकारला. मात्र, त्यानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षांसोबत चार कार्यकारी अध्यक्षांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह, प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे हे चार कार्यकारी अध्यक्षांमध्ये असणार, की आणखी नवे चेहरे यात दिसणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.