AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…तर जयंतरावांना ईश्वराला शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य मागावं लागेल”

चंद्रपूर : “जयंत पाटलांची (Jayant Patil) मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही. पवार साहेबांचंच कुटुंब फार मोठं आहे. या कुटुंबाला संधी देता-देता जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल,” अशी उपरोधिक टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. ते चंद्रपूरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. ईस्लामपूरमध्ये बोलताना जलसंपदामंत्री […]

...तर जयंतरावांना ईश्वराला शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य मागावं लागेल
| Updated on: Jan 21, 2021 | 2:57 PM
Share

चंद्रपूर : “जयंत पाटलांची (Jayant Patil) मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही. पवार साहेबांचंच कुटुंब फार मोठं आहे. या कुटुंबाला संधी देता-देता जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल,” अशी उपरोधिक टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. ते चंद्रपूरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. ईस्लामपूरमध्ये बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच दिवास्वप्न नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. जयंत पाटलांच्या याच विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Sudhir Mungantiwar comment on Jayant Patil desire of becoming chief minister)

जयंत पाटील काय म्हणाले?

दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं आपण म्हटल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

माझ्या विधानाची मोडतोड केली

दरम्यान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकट केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच. त्यांनी ट्विट करत असे वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. माझ्या विधानाची मोडतोड करुन दिशाभूल केल्याचं त्यांनी त्यांनी म्हटलं आहे.

अतुल भातखळकरांची खोचक टीका

जयंत पाटिल यांच्याविषयीचे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच भाजप नेते अतुल भातखळकर यांनीसुद्धा राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी केली. आता महाविकास आघाडीत फक्त युवा आमदार रोहित पवार यांनाच मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडायचे बाकी आहे, अशी खोचक  टीप्पणी केली होती.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न जयंत पाटलांचं, भाजपचा टोला रोहित पवारांना

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

(Sudhir Mungantiwar comment on Jayant Patil desire of becoming chief minister)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?