मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. (i want to become a cm says jayant patil)

भीमराव गवळी

|

Jan 21, 2021 | 12:12 PM

सांगली: गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (i want to become a cm says jayant patil)

इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

तरुणांना कानमंत्र

यावेळी पाटील यांनी तरूणांना राजकीय यशाचा कानमंत्रही दिला. तरूणांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. त्यांना जनतेत उतरून काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.

उमेदवार हवा म्हणून जाहिरात द्यावी लागेल

सध्या सर्वच पक्षांमध्ये उत्साही आणि वैचारिक बांधिलकी असलेल्या तरुणांची कमतरता आहे, असं सांगतानाच शिकलेल्या तरुणांनी राजकारणाला प्राधान्य दिलं पाहिजे. तरुणांनी चौकात बॅनर लावण्यापेक्षा जनतेत उतरून काम केलं पाहिजे. आपआपसातील संघर्ष टाळून प्रगतीवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सांगतानाच नाहीतर काही दिवसांनी उमेदवार हवा म्हणून राजकीय पक्षांना जाहिरात द्यावी लागेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, जयंत पाटील हे राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्त्व आहे. ते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. पाटील यांनी नऊ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. (i want to become a cm says jayant patil)

संबंधित बातम्या:

एमपीएससीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकारच नाही; मराठा आरक्षणाचा वाद चिघळणार?

सरकारचा मोठा निर्णय, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार, वाचा सविस्तर

बैठकीला गैरहजेरीचं कुठलंही कारण नको, दांडीबहाद्दर मंत्र्यांना अजितदादांची तंबी

(i want to become a cm says jayant patil)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें