विदर्भ मराठावाड्यासंदर्भात Ajit Pawar यांनी काहीचं उत्तर दिलं नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं टीकास्त्र

| Updated on: Mar 16, 2022 | 6:16 PM

ज्य सरकारकडून खोटी आकडेवारी देऊन विश्वासघात केला जात असल्याचं ते म्हणाले. काश्मीर फाईल्स सिनेमासंदर्भात देखील मुनगंटीवार यांनी भाष्य केलं.

विदर्भ मराठावाड्यासंदर्भात Ajit Pawar यांनी काहीचं उत्तर दिलं नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं टीकास्त्र
सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांवर निशाना
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही मुद्द्यावर अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काहीच उत्तर दिले नाही. मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारकडून धानाच्या संदर्भात एक रुपयांचा बोनस दिला जात नाही, हे देखील सांगितलं. निधीचं समतोल वाटप व्हावं हा आमचा अधिकार आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. तर, राज्य सरकारकडून खोटी आकडेवारी देऊन विश्वासघात केला जात असल्याचं ते म्हणाले. काश्मीर फाईल्स सिनेमासंदर्भात देखील मुनगंटीवार यांनी भाष्य केलं.

मतांच्या लाचारीसाठी संभाजीनगर नाव नाही

सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात खोटी आकडेवारी देऊन जनतेच विश्वासघात केला जात आहे. मतांच्या लाचारीपोटी औरंगाबादचं नाव संभाजीनगर नाव देण्यात आलेलं नाही. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली जात नाहीत.

वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम

काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याच्या 92 आमदारांच्या मागणीवर या सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले. राज्याच्या आर्थिक स्थितीची दाणादण करण्याचं काम या सरकारकडून करण्यात आलं आहे. आम्ही जनते मध्ये जाऊ आणि हे प्रश्न मांडू असं देखील त्यांनी म्हटलंय.

प्रविण दरेकर यांना दिलासा मिळेल

प्रविण दरेकर यांच्या विरोधात मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी एफआयरआर दाखल करण्यात आला आहे. प्रविण दरेकर यांनी त्यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली आहे. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. प्रविण दरेकर यांच्यावर सूड भावनेने हा गुन्हा दाखल झाला आहे. अर्थसंकल्पातील चर्चेत त्यांनी सहभाग घेऊ नये आणि तणावात असावे या साठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. कोर्टानं त्यांना तांत्रिक कारणाने दिलासा दिला नाही. पण, मला विश्वास आहे की त्याची पूर्तता करून दिलासा मिळेल, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या:

सरकारी कार्यालयात Mobile वापरावर बंदी येणार? मद्रास हायकोर्टात मोबाईलच्या वापरावर महत्त्वपूर्ण सुनावणी

Video: 50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Ajit Pawar यांनी स्पष्टचं सांगितलं, संभ्रम दूर करणारा व्हिडीओ पाहिला का?