Vidyanand Bapat: विद्यानंद बापटांसारखं मी मराठी बोलू शकत नाही, पण..डीजेवरुन सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांनी पुण्यातील गणेशोत्सव काळातील डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा उचलून धरला. आता यावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापटांसारखं मी मराठी बोलू शकत नाही, पण..डीजेवरुन सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
vidyanand-bapat
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 9:57 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गणेशोत्सव काळातील डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु आहे. यावादात पुण्यातील विद्यानंद बापट यांनी लक्ष वेधले होते. त्यांनी डीजेचा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी देखील घेणे आवश्यक आहे असे म्हणत विरोध केला होता. त्यानंतर विद्यानंद बापट हे चर्चेत आले. डीजे बंदीच्या मुद्द्यावरून सर्व स्तरावरून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत असताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनीही याबाबत आपले मत मांडले आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थितीत फरक असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी बापट यांना खोचक टोला लागवला आहे.

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

सुजय विखे पाटील म्हणाले, “मी बापटा सारखा मराठी बोलू शकत नाही. खरंतर ज्याचा त्याचा आउटलूक आहे. आमच्या ग्रामीण भागात डीजेचा त्रास नाही. गावात मोठमोठ्या इमारती नाहीत, त्यामुळे डीजे वाजत वाजत कधी निघून जातो हे कळतही नाही. मात्र शहरी भागात प्रश्न वेगळे आहेत. तिथे वाहतूक समस्या, इमारती, हॉस्पिटल यांसारख्या गोष्टी असल्याने तिथला प्रश्न वेगळा आहे. त्यामुळे मी ग्रामीण भागाचे नेतृत्व करत असताना आमच्या युवकांना डीजे लागतो आणि आम्ही तो वाजू देतो.”

डीजे बंदीच्या मुद्द्यावरून राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी ग्रामीण भागातील वास्तव सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, शहरी भागातील समस्या लक्षात घेऊन निर्णय घेतला जावा, तर ग्रामीण भागात युवकांच्या मागण्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

पुण्यातील डीजे बंदीबाबत वक्तव्य केल्यानंतर विद्यानंद बापट यांना मारहाण झाली होती. टीव्ही ९ मराठीशी बोलताना एका तरुणाने त्यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर बापट यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्यानंतर ते डीजेविरोधात काढलेल्या रॅलीमध्येही सहभागी झाले नाहीते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us