एक अभ्यास नसलेला माणूस दुसऱ्या अभ्यास नसलेल्या माणसाला म्हणतो तूच हुशार; राणांच्या ‘त्या’ टिकेवर सुषमा अंधारेंचा टोला

| Updated on: Oct 05, 2022 | 10:00 AM

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

एक अभ्यास नसलेला माणूस दुसऱ्या अभ्यास नसलेल्या माणसाला म्हणतो तूच हुशार; राणांच्या त्या टिकेवर  सुषमा अंधारेंचा टोला
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई :  शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच दसरा मेळाव्यातील भाषण ऐकणार, कारण त्यांच्या विचारामध्ये मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे विचार दिसतात उद्धव ठाकरेंच्या विचारांमध्ये बाळासाहेबांचे विचारत दिसत नाहीत असं राणा यांनी म्हटलं होतं. सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना जोरदार टोला लगावला आहे. अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंंधारे?

अंधारे यांनी नवनीत राणांना जोरदार टोला लगावला आहे. एक अभ्यास नसलेली व्यक्ती दुसऱ्या अभ्यास नसलेल्या व्यक्तीला म्हणते तुच हुशार, परत दुसरी व्यक्ती तिला म्हणते नाही तूच हुशार अशी टीका अंधारे यांनी नवनीत राणांवर केली आहे.

मुख्यमंत्र्यांना टोला

दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे हे कागदावरील भाषण वाचताच. मी त्यांना अनेकदा कागदावरील भाषण वाचताना पहायलं आहे.  मात्र बाळासाहेब ठाकरे हे कधीही वाचून भाषण करत नव्हते. मुख्यमंत्री काय भाजपाची स्क्रिप्ट वाचणार का असा खोचक सवाल अंधारे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यातून काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचार मांडणार असल्याची टीका शिंदे गटाकडून सुरू आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आजच्या होणाऱ्या भाषणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.