AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडूंना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं, त्यांचा प्रेमभंग झाला; सुषमा अंधारे यांचा खोचक टोला

सध्या आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावरून विरोधकांकडून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला जात आहे.

बच्चू कडूंना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं, त्यांचा प्रेमभंग झाला; सुषमा अंधारे यांचा खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2022 | 11:35 AM
Share

मुंबई :  सध्या आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावरून विरोधकांकडून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे  नेते विनायक राऊत यांच्यानंतर आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील जोरदार टीका केली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे?

सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं.  बच्चू  कडू यांना आता काहीच किंमत राहिली नाही, त्यांचा विश्वासघात झाला आहे. ते स्वाभीमानी नेते आहेत मात्र बच्चू कडू यांनी शिंदे यांच्यासोबत जाऊन आपला स्वाभिमान गहाण टाकल्याची टीका अंधारे यांनी केली आहे.

विनायक राऊतांचा निशाणा

दरम्यान दुसरीकडे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखील बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील  वादावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. आज बच्चू कडू आणि रवी राणा आमने-सामने आहेत. उद्या भाजप आणि शिंदे गट एकोमेंकांच्या उरावर बसतील. शिंदे गटात सर्वच जण स्वार्थासाठी गेले. मात्र आता एकालाही मंत्रीपद मिळणार नसल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपला प्रत्युत्तर दिले आहे. रवी राणा यांनी खोके घेतल्याचे पुरावे द्यावेत अन्यथा आम्ही एक नोव्हेंबरला सात ते आठ आमदार मिळून वेगळा निर्णय घेऊ असा इशारा कडू यांनी दिला आहे.

Follow Us
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....