संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, भाजपची आक्रमक मागणी

| Updated on: Dec 17, 2020 | 2:09 PM

संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत (Kanjurmarg Metro car shed) हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर टिपण्णी केली होती.

संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, भाजपची आक्रमक मागणी
Follow us on

मुंबई : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी” असं प्रविण दरेकर म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Pravin Darekar on Sanjay Raut)

संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत (Kanjurmarg Metro car shed) हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर टिपण्णी केली होती. हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. ही जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे (Maharashtra BJP) असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

“संजय राऊतांकडून कोर्टाचा अवमान”

त्याबाबत प्रविण दरेकर म्हणाले, “आम्हाला सत्ता गेल्याच दुःख नाही, कारण भाजपचे दोनवरुन 300 पर्यंत खासदारांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे त्याची चिंता राऊतांनी करु नये. संजय राऊतांनी कोर्टावर असं भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच असे आरोप करणे चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

‘कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा विषय आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरं बांधणार होतं. मग आता ही जमिन सरकारची नाही का? अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली. ( सविस्तर बातमी –  कांजूरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!

संबंधित बातम्या:

कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा; देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ठाकरे सरकारचेही तेच झाले; नितेश राणेंचा कांजूरमार्ग कारशेडवरून टोला 

(Pravin Darekar on Sanjay Raut)