शिवसेनेच्या 'या' मंत्र्याकडे दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले (eknath shinde get two district guardian minister) आहे.

eknath shinde get two district guardian minister, शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याकडे दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जिल्हानिहाय पालकमंत्रिपद जाहीर (eknath shinde get two district guardian minister) केले. या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहेत. यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद देण्यात आले आहे. शिंदेंकडे याआधीही ठाणे जिल्ह्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता शिंदे यांना दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली (eknath shinde get two district guardian minister) आहे.

यात मुंबई शहराच्या पालकमंत्रिपदी काँग्रेस नेते आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची वर्णी लागली आहे. तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्रिपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे.

सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचा कार्यभार आहे. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले (eknath shinde get two district guardian minister) आहे.

एकनाथ शिंदे यांची माहिती 

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मानाचं पान असलेला शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख आहे. कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे.

शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह (एमएसआरडीसी, सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्रीपद सांभाळले आहे. 1997 मध्ये एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये शिवसेना विधीमंडळाचे गटनेते म्हणून शिंदेंची नियुक्ती (eknath shinde get two district guardian minister) झाली.

राष्ट्रवादी (12)

1. पुणे- अजित अनंतराव पवार
2. रायगड – आदिती सुनिल तटकरे
3. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
4. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
6. सांगली- जयंत राजाराम पाटील
7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
8. जालना- राजेश अंकुशराव टोपे
9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

शिवसेना (13)

1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
3. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब
4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
5. पालघर- दादाजी दगडू भुसे
6. धुळे- अब्दुल नबी सत्तार
7. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील
8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
11. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे
12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

काँग्रेस (11)

1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
2. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
6. लातूर- अमित विलासराव देशमुख
7. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार
10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
11. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार

संबंधित बातम्या : 

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, आदित्य ठाकरेंकडे ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

ठाकरे सरकारचे पालकमंत्री जाहीर, कोणत्या पक्षाला किती पालकमंत्रिपदं?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *