ठाकरे सरकारचे पालकमंत्री जाहीर, कोणत्या पक्षाला किती पालकमंत्रिपदं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जिल्हानिहाय पालकमंत्रिपद जाहीर (district guardian minister declare) केले.

ठाकरे सरकारचे पालकमंत्री जाहीर, कोणत्या पक्षाला किती पालकमंत्रिपदं?
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 10:09 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जिल्हानिहाय पालकमंत्रिपद जाहीर (district guardian minister declare) केले. खातेवाटपानंतर सर्वांचे लक्ष जिल्हानिहाय पालकमंत्री कोण होणार याकडे लागले होते. आज (8 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर केली.

या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद मिळालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले (district guardian minister declare) आहे.

यात मुंबई शहराच्या पालकमंत्रिपदी काँग्रेस नेते आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची वर्णी लागली आहे. तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्रिपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळालेले आहे.

राष्ट्रवादी (12)

1. पुणे- अजित अनंतराव पवार 2. रायगड – आदिती सुनिल तटकरे 3. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 4. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ 5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 6. सांगली- जयंत राजाराम पाटील 7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 8. जालना- राजेश अंकुशराव टोपे 9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे 11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे 12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

शिवसेना (13)

1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे 2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे 3. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब 4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत 5. पालघर- दादाजी दगडू भुसे 6. धुळे- अब्दुल नबी सत्तार 7. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील 8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई 9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई 10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड 11. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे 12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

काँग्रेस (11)

1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख 2. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी 3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड 5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण 6. लातूर- अमित विलासराव देशमुख 7. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार 10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 11. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार

संबंधित बातम्या : 

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, आदित्य ठाकरेंकडे ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.