TMC Election 2022 Ward 38 | ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 38 मध्ये इच्छुकांनी सुरू केली मोर्चेबांधणी…

ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 142 आहे. ठाणे महापालिकेत एकूण 47 प्रभाग आहेत. त्यात तीन सदस्यीय प्रभाग 46 असून चार सदस्यी प्रभाग एक आहे. महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 10 तर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा राखीव आहेत. तसेच महिलांसाठी 71 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

TMC Election 2022 Ward 38 | ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 38 मध्ये इच्छुकांनी सुरू केली मोर्चेबांधणी...
TMC Election 2022 Ward 38Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 4:18 PM

मुंबई : ठाणे (Thane) शहरात महापालिकेच्या निवडणूकीची तयारी सुरू आहे. ठाण्याच्या महापालिका निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाणे आहे. नुकताच राज्यात मोठी बंडखोरी झाली आणि थेट राज्यातील महाविकास आघाडी सरकारच कोसळले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) असून ठाणे महापालिका आपल्याच हातात ठेवण्यासाठी ते नक्कीच प्रतिष्ठापणाला लावणार. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तसेच ठाणे महापालिकेतील काही नगरसेवक नुकताच शिंदे गटात सामील देखील झाल्याने यंदाच्या निवडणूकीमध्ये (Election) नेमके काय होते, हे बघण्यासारखे ठरणार आहे. ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,26,003 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,698 एवढी आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 142

ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 142 आहे. ठाणे महापालिकेत एकूण 47 प्रभाग आहेत. त्यात तीन सदस्यीय प्रभाग 46 असून चार सदस्यी प्रभाग एक आहे. महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 10 तर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा राखीव आहेत. तसेच महिलांसाठी 71 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर डॉ. विपीन शर्मा हे महापालिकेचे आयुक्त आहेत. प्रभागांची आरक्षणे यावर्षी बदलली आहेत. पूर्वी 33 प्रभाग होते. आता 47 आहेत. आता नव्या झालेल्या प्रभाग क्रमांक 38 प्रभागामध्ये इच्छुकांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरूवात केलीयं.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

राजकिय समिकरण बदलल्याने काय होणार परिणाम

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेक राजकिय समिकरणे बदलली आहेत. यामध्ये बंडखोरीचा सर्वात जास्त परिणाम हा ठाणे महापालिकेवर होणार हे नक्कीच आहे. कारण एकनाथ शिंदे हे ठाण्याचेच असून महापालिकेमध्ये शिंदेचे मोठे वजन आहे. सध्या पालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. मात्र, आता येणाऱ्या निवडणूकीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. परत एकदा राज्यात शिवसेना विरूध्द शिंदे गट असा संघर्ष बघायला मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा

प्रभागातील आरक्षणांनी बिघडले अनेकांचे गणित

ठाणे महापालिकेत पूर्वी 33 प्रभाग होते. आता नवीन प्रभाग रचनेप्रमाणेनुसार आता 47 आहेत. या नवीन वाॅर्डामुळे अनेकांना संधी मिळणार आहे. सर्वच इच्छुक कामाला लागले असून निवडून येण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेण्यास सुरूवात केलीयं. मित्तल मैदानाजवळील देसाई खाडीपासून पश्चिमेकडे रस्ताने गरीब नवाज चाळीपर्यंत, त्यानंतर दक्षिणेकडे कंपाउंड भितीने हातीम चेंबरपर्यत, त्यानंतर दक्षिणेकडे कंपाऊंड मितीने सायली इमारतीपर्यंत त्यानंतर दक्षिणेकडे इमेज बिल्डिंगपर्यंत त्यानंतर पश्चिमेकडे कंपाउंड भितीने वफा पार्क कॉम्प्लेक्सपर्यंत दक्षिणेस कंपाऊंड ने इमाम बिल्डिंगपर्यंत त्यानंतर पश्चिमेकडे रस्त्यानंतर पश्चिमेकडे रस्त्याने जुन्या मुंबई पुणे महामार्गापर्यंत.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष
Non Stop LIVE Update
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.