Uddhav Thackeray : ‘ना ना करते प्यार, तुम्ही से कर बैठे…’, लिफ्टमधल्या भेटीवर उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील भाजपाचे मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात एकत्र लिफ्टने प्रवास केला. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. यावर आज उद्धव ठाकरे यांनी मिश्किल पण सूचक टिप्पणी केली. भविष्याच राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे त्यातून स्पष्ट होतं.

Uddhav Thackeray : ना ना करते प्यार, तुम्ही से कर बैठे..., लिफ्टमधल्या भेटीवर उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य
वंचितविषयी काय भूमिका?
| Updated on: Jun 27, 2024 | 1:40 PM

“माझ्या काळात कोरोना होता. पेपर फुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही लिफ्टमध्ये होतो. अनेकांना वाटलं असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… ती अनौपचारिक भेट झाली. काही चर्चा नाही. भिंतीला कान नसतात. त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू” असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

पुणे ड्रग्स प्रकरणावरही आवाज उठवणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही त्यावर आवाज उठवणार आहोत. पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचं आहे. हे ड्रग्स येतात कुठून? राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे सोर्स आहेत का? उद्योगमंत्री काय करतात? उद्योगमंत्र्यांचे हे सोर्स आहे का? या गोडाऊनचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ड्रग्स प्रकरणावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कुणाचेही सगे सोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको. त्याच्या मुळाशी जा आणि खणून काढा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मला चॉकलेट चंद्रकांत दादांनी दिलं’

“जे पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर करतात. त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांना सेवेतून मुक्त केलं पाहिजे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “ज्यांनी मला चॉकलेट दिलं. चंद्रकांत दादांनी दिलं. त्यांच्याकडे पत्रकारांनी तक्रार केली, तर आमच्याकडे माहिती नाही. तुमच्याकडे आधी माहिती येते. आम्हाला आणखी कामे आहेत, असं ते म्हणाले. हा गाजर संकल्प आहे. गाजरं दाखवलं जात आहे. आजपर्यंत ज्या घोषणा केल्या, त्याची अमलबजावणी किती झाली? त्याची श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका कोरा कागद असणार आहे. याची मला खात्री आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.