Uddhav Thackeray property | दोन घरं, एक फार्म हाऊस, एकही वाहन नाही, उद्धव ठाकरेंची संपत्ती किती?

| Updated on: May 12, 2020 | 12:50 AM

संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीचे (Uddhav Thackeray property) आकडे अखेर समोर आले आहेत.

Uddhav Thackeray property | दोन घरं, एक फार्म हाऊस, एकही वाहन नाही, उद्धव ठाकरेंची संपत्ती किती?
Follow us on

मुंबई : संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीचे (Uddhav Thackeray property) आकडे अखेर समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे 143 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं.  (Uddhav Thackeray property).  

स्वत:कडे एकही वाहन नाही, दोन घरं आहेत, एक फार्महाऊस आहे, तसंच विविध कंपन्यांच्या शेअर्समधून येणारा डिव्हिडंट हे उत्पन्नाचे स्त्रोत अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात दिल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे.

उद्धव ठाकरे हे संपत्ती जाहीर करणारे दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत्ती जाहीर केली होती. (Uddhav Thackeray property)

उद्धव ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाचे मुद्दे

उद्योग व्यवसायाच्या कॉलममध्ये उद्धव ठाकरेंनी – नोकरी म्हटलं आहे.
तर पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावासमोर – उद्योग/व्यवसाय आहे.

उत्पन्नाचा स्त्रोत
उद्धव ठाकरे- पगार/वेतन, व्याज, बोनस, लाभांश (डिव्हिडंट), भांडवली नफा
रश्मी ठाकरे – व्याज, भाडे, व्यावसायिक भागीदारी नफा,

उद्धव ठाकरेंची संपत्ती – 76 कोटी 59 लाख 57 हजार 577
रश्मी ठाकरेंची संपत्ती – ‬65 कोटी 09 लाख 02 हजार 791
हिंदू अविभक्त कुटुंब – 1 कोटी 58 लाख 14 हजार 395
एकूण – 143 कोटी 26 लाख 74 हजार 763‬

tv9marathi.com

———————————–

ठाकरेंच्या संपत्तीचं विवरण

उद्धव ठाकरे यांची संपत्ती (जंगम – एकूण 24 कोटी 14 लाख 99 हजार 593)
रश्मी ठाकरे यांची संपत्ती (जंगम – ३६ कोटी १६ लाख ४३ हजार ४५५)
हिंदू अविभक्त कुटुंब (जंगम – १ कोटी ५८ लाख १४ हजार ३९५)

रोख रक्कम –

  • उद्धव ठाकरे – 76,922
  • रश्मी ठाकरे – 89679
  • हिंदू अविभक्त कुटुंब – 39,124

tv9marathi.com

बँक डिपॉझिट्स –

  • उद्धव ठाकरे – 1 कोटी 60 लाख 93 हजार 675
  • रश्मी ठाकरे – 34 लाख 86 हजार 559
  • हिंदू अविभक्त कुटुंब – 56 लाख 21 हजार 439

tv9marathi.com

शेअर्स

  • उद्धव ठाकरे – २१ कोटी ६८ लाख ५१ हजार १
  • रश्मी ठाकरे – ३३ कोटी ७९ लाख ६२ हजार ४६०
  • हिंदू अविभक्त कुटुंब – २९ लाख ५८ हजार १४९

पोस्ट किंवा विमामधील गुंतवणूक

  • उद्धव ठाकरे – ३ लाख रुपये
  • रश्मी ठाकरे – ३ लाख रुपये
  • हिंदू अविभक्त कुटुंब – –

कर्ज दिले – येणे बाकी

  • उद्धव ठाकरे – –
  • रश्मी ठाकरे – ६ लाख ६६ हजार ११२
  • हिंदू अविभक्त कुटुंब –

वाहन

  • उद्धव ठाकरे – नाही
  • रश्मी ठाकरे – नाही
  • हिंदू अविभक्त कुटुंब – नाही

सोने, दागिने

  • उद्धव ठाकरे – २३ लाख २० हजार ७३६
  • रश्मी ठाकरे – १ कोटी ३५ लाख २० हजार ९२९
  • हिंदू अविभक्त कुटुंब – ५३ लाख ४८ हजार ३०५

मिळकत/व्याज

  • उद्धव ठाकरे – ५८ लाख ५७ हजार २५९
  • रश्मी ठाकरे – ५६ लाख १७ हजार ७१६
  • हिंदू अविभक्त कुटुंब – १८ लाख ४७ हजार ३७८

स्थावर मालमत्ता (जमिनीची किंमत)

  • उद्धव ठाकरे – ५२ कोटी ४४ लाख ५७ हजार ९८४
  • रश्मी ठाकरे – २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६
    हिंदू अविभक्त कुटुंब –

कर्ज

  • उद्धव ठाकरे – ४ कोटी ०६ लाख ०३ हजार ६२४
  • रश्मी ठाकरे – ११ कोटी ४४ लाख ३३ हजार १०९
  • हिंदू अविभक्त कुटुंब –

उद्योग/व्यवसाय

  • उद्धव ठाकरे – नोकरी
  • रश्मी ठाकरे – व्यवसाय

tv9marathi.com

उत्पन्नाचे साधन 

  • उद्धव ठाकरे – पगार/वेतन, व्याज, बोनस, लाभांश (डिव्हिडंट), भांडवली नफा
  • रश्मी ठाकरे – व्याज, भाडे, व्यावसायिक भागीदारी नफा
  • हिंदू अविभक्त कुटुंब –

शिक्षण
उद्धव ठाकरे –

  • बालमोहन विद्यामंदीर, दादर, मुंबई
  • सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, (डिप्लोमा) – वर्ष 1982

यापूर्वी विधानसभा निवडणुकीला आदित्य ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती.

आदित्य ठाकरे यांची संपत्ती

  • बँक ठेवी – 10 कोटी 36 लाख रुपये
  • बॉन्ड शेअर्स– 20 लाख 39 हजार रुपये
  • वाहन – BMW कार (MH -09 CB -1234) 2010 – किंमत अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये
  • दागिने– 64 लाख 65 हजार
  • इतर – 10 लाख 22 हजार
  • एकूण – 11 कोटी 38 लाख
  • दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये
  • कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे 44 लाख रुपये

(Uddhav Thackeray property)

संबंधित बातम्या  

कोल्हापूर पासिंगची BMW ; 10 कोटींच्या ठेवी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती ?