Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेननं हिंदुत्वापासून फारकत घेतली? उद्धव ठाकरेंनी दोन ओळीत सर्व काही सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केलीय. विरोधकांकडून शिवसेना आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली, असा आरोप केला जातोय. अशावेळी शिवसेना म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच शिवेसना, असा असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलंय.

Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेननं हिंदुत्वापासून फारकत घेतली? उद्धव ठाकरेंनी दोन ओळीत सर्व काही सांगितलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 6:11 PM

मुंबई : शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 35 आमदार घेऊन थेट आसाममधील गुवाहाटी गाठली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार अडचणी आलंय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केलीय. विरोधकांकडून शिवसेना आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, शिवसेना हिंदुत्वापासून (Hindutva) दूर गेली, असा आरोप केला जातोय. अशावेळी शिवसेना म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच शिवेसना, असा असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन

विरोधक आणि स्वकियांच्या आरोपांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे. कोणी दोघांना एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य, एकनाथ शिंदे आमदार, खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुखय्मंत्री असेल. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही? बाळासाहेब गेल्यानंतर 2014 ची निवडणूक एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसाच आहे. तेव्हा 63 आमदार आले. तेव्हाही ते मंत्री होते. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा, असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना केलंय.

शस्त्रक्रिया झाली म्हणून मी भेटत नव्हतो- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले की, कुणाच्या अनुभवाला कोविड आला नव्हता. तो अनुभव माझ्या वाट्याला आला. कोविडपासून सावध कसं राहायचं हे तुम्हाला का सांगतो. जेव्हा सर्व्हे होत होता. तेव्हा देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यात महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची गणना केली गेली. पण मी आज तुमच्यासमोर वेगळे मुद्दे घेऊन आलो आहे. शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? मुख्यमंत्री भेटत का नव्हते? मुख्यमंत्री भेटत नव्हते हे काही दिवसांपूर्वी सत्य होतं. कारण माझी शस्त्रक्रिया झाली. अनुभव सांगणार नाही. पण दोन ते तीन महिने मी भेटू शकत नव्हतो. हा मुद्दा बरोबर आहे. त्यानंतर मी भेटायला सुरुवात केली आहे. मी भेटत नव्हतो पण कामं थांबली नव्हती, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.