AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काका अयान मुखर्जी याच्यासोबत फिरायला निघाली राहा कपूर, क्यूटनेस पाहून म्हणाल…

Raha Kapoor | अभिनेत्री आलिया भट्ट - अभिनेता रणबीर कपूर यांची लेक राहा कपूर हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे... व्हिडीओमध्ये राहा काका अयान मुखर्जी याच्यासोबत बाहेर फिरताना दिसत आहे... व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत...

काका अयान मुखर्जी याच्यासोबत फिरायला निघाली राहा कपूर, क्यूटनेस पाहून म्हणाल...
| Updated on: May 05, 2024 | 3:32 PM
Share

अभिनेत्री आलिया भट्ट – अभिनेता रणबीर कपूर यांची लेक राहा कपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत अव्वल स्थानी आहे. राहा हिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी कायम उत्सुक असतात. तर चाहते देखील राहा हिला पाहण्यासाठी उत्सुक असतात. आता देखील राहा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राहा काका अयान मुखर्जी याच्यासोबत फिरताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त अयान मुखर्जी आणि राहा कपूर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

अयान मुखर्जी आणि राहा हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राहा हिला कडेवर घेऊन अयान मुंबईतील वांद्रे भागातील एका कॅफेबाहेर पोहोचला. राहा हिच्या हातात एक पाकीटही दिसत आहे. यासोबत खेळताना राहा चे एक्सप्रेशन लोकांची मने जिंकणारे आहेत.

राहा हिच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘राहा पूर्णपणे आलिया हिची कार्बन कॉपी आहे.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘राहा ऋषी कपूर यांची कार्बन कॉपी आहे…’, राहा हिच्या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रेम व्यक्त करत आहेत.

राहा कपूर…

राहा कपूर हिचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. आलिया भट्ट हिने सोनोग्राफीचा एक फोटो पोस्ट करत प्रग्नेंट असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. एवढंच नाहीतर, 25 डिसेंबर 2023 मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लेकीचा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला. त्यानंतर अनेकदा राहा हिला कुटुंबियासोबत स्पॉट करण्यात आलं.

आलिया भट्ट – रणबीर कपूर यांचे आगामी सिनेमे

आलिया भट्ट – रणबीर कपूर यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर कपूर लवकरच ‘रामायण’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘लव्ब एन्ड वॉर’ मध्ये देखील रणबीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘जिगरा’ सिनेमात अभिनेत्री दिसणार आहे.

Follow Us
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?