AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता…’ मालिकेतील सेलिब्रिटीच्या घरी दीड वर्षात दोन मृत्यू, अभिनेत्री म्हणाली, ‘तुझ्या निधनानंतर…’

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर... दीड वर्षात कुटुंबातील दोन सदस्यांचं निधन, दुःख व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, 'तुझ्या निधनानंतर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा...

'तारक मेहता...' मालिकेतील सेलिब्रिटीच्या घरी दीड वर्षात दोन मृत्यू, अभिनेत्री म्हणाली, 'तुझ्या निधनानंतर...'
| Updated on: May 05, 2024 | 3:04 PM
Share

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून लोकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जेनिफर मिस्त्री हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबात दीड वर्षात दोन सदस्यांचं निधन झालं आहे. जेनिफर हिने तिच्या आयुष्यातील सर्वत महत्त्वाच्या व्यक्तीला गमावलं आहे. नुकताच जेनिफर हिच्या लहान बहिणीचं निधन झालं आहे. बहिणीच्या निधनानंतर अभिनेत्री पूर्णपणे कोलमडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या भावाचंन निधन झालं होतं.

आता जेनिफर हिने बहिणीच्या निधनानंतर सोशल मीडियावर बहिणीसोबत काही फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र जेनिफर हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. जेनिफर म्हणाली, ‘माझी प्रिय बहीण डिंपल… मी कधी विचार देखील केला नव्हता की मी तुला गमावेल… तुझ्या निधनाला फक्त 21 दिवस झाले आहेत. पण असं वाटत आहे की तुझ्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत…’

‘तुझ्या गोंधळाशिवाय… विनोदाशिवाय… पूर्ण घर रिकामं वाटत आहे. आम्ही तुला कधीच विसरू शकत नाही. तुझ्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील… तुझी प्रत्येक आठवण आम्ही सांभाळून ठेवू…’ असं म्हणत जेनिफर हिने बहिणीच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

पुढे जेनिफर म्हणाली, ‘तू आम्हाला आनंदी राहायला शिकवलं… मी जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे, जिला तुझ्यासारखी बहीण भेटली… कोणतंही स्वार्थ न बाळगता तू माझ्यावर प्रेम केलं. जे प्रेम तू मला दे, तसं प्रेम मला कोणीच देवू शकत नाही… आय लव्ह यू डिंपल…’

‘दीड वर्षात मी माझ्या बहिणीला आणि भावाला गमावलं आहे. हे दुःख काय आहे हे फक्त मी समजू शकते….’ असं देखील अभिनेता म्हणाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जेनिफर हिने केलेल्या पोस्टची चर्चा रंगत आहे. जेनिफर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान