AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचं कमबॅक होणार; मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?

राज्यातील मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचं कमबॅक होणार असल्याची माहिती आली आहे.

मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचं कमबॅक होणार;  मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?
sunetra pawar news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 3:18 PM
Share

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी मंत्र्याचं लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  यासाठी एक माजी मंत्री आणि वरिष्ठ मंत्र्याने महायुतीमधील प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. ही भेट रविवारी रात्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीला ग्रीन सिग्नल दिला आहे. या माजी मंत्र्‍यासाठी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी गुरुवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीमुळे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या नेत्याला सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी देण्याची विनंती स्वत: सुनेत्रा पवार यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

सुनेत्रा पवार यांनी याआधी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्यानंतर या कमिटीमधील मंडळींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सोमवारी सायंकाळी चार वाजता कोअर कमिटीची बैठक होईल. ज्या मंत्र्याचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल, त्या नेत्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आज देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार देखील नव्हते. ही भेट राष्ट्रवादीला अर्थखाते पुन्हा मिळावे, यासाठी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी दिल्लीतील या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या फोटोमध्ये दिसताहेत. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका