Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कोरोनावर मात

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनावर मात केली आहे. (Union minister Nitin Gadkari Recover From COVID 19)

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कोरोनावर मात
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 4:14 PM

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. नितीन गडकरी यांनी 16 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. तब्बल 15 दिवसांनी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. (Nitin Gadkari Recover From COVID 19)

मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या जोरावर मी कोरोनातून बरा झालो आहे. तुम्ही दाखवलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद, असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले आहे.

नितीन गडकरी यांना 16 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. नुकतंच त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत.

“काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण केले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा”, असं ट्वीट नितीन गडकरी यांनी कोरोना लागण झाल्यानंतर केले होते.

नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली असतानाही ते ट्वीटवर फार सक्रीय पाहायला मिळत होते. देशभरात घडणाऱ्या अनेक घटनांवर त्यांनी त्यांची मतं व्यक्त केले होते.(Nitin Gadkari Recover From COVID 19)

संबंधित बातम्या : 

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

Abu Azmi Corona | आमदार अबू आझमींना कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.