Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona Infected Nitin Gadkari).

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona Infected Nitin Gadkari). त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

“काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण केले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा”, असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केले आहे.

अबू आझमी यांनाही लागण 

दरम्यान नुकतंच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी तब्ब्येत बिघडली होती. त्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. सध्या माझी प्रकृती ठिक आहे. गेल्या चार दिवसांपासून संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन अबू आझमी यांनी केले आहे.

तर नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती चिखलीकरांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्रात आज 23 हजार 365 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज 17 हजार 559 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे सध्या एकूण 7 लाख 92 हजार 832 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 2 लाख 97 हजार 125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.71 टक्के झाले आहे

संबंधित बातम्या :

Abu Azmi Corona | आमदार अबू आझमींना कोरोनाची लागण

महिनाभरापूर्वी कोरोनामुक्त, भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची लागण

Published On - 10:10 pm, Wed, 16 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI