डोनाल्ड ट्रम्प यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’, राष्ट्रपती भवनात जंगी स्वागत

| Updated on: Feb 25, 2020 | 10:23 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज भारत दौऱ्याचा (Donald trump Rashtrapati Bhavan) दुसरा दिवस आहे. ट्रम्प यांना आज भारतीय सैन्यदलाकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांना गार्ड ऑफ ऑनर, राष्ट्रपती भवनात जंगी स्वागत
डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौरा पूर्ण करुन मंगळवारी रात्री अमेरिकेसाठी रवाना होतील.
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज भारत दौऱ्याचा (Donald trump Rashtrapati Bhavan) दुसरा दिवस आहे. ट्रम्प यांना आज भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांचं सपत्नीक पारंपरिक पद्धतीनं (Donald trump Rashtrapati Bhavan) राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीने ट्रम्प दाम्पत्याचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं.

ट्रम्प कुटुंबियांसाठी राष्ट्रपती भवनात खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थिती स्नेहभोजन होणार आहे. मात्र ट्रम्प यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना निमंत्रण नसल्याने मनमोहन सिंह आणि गुलाम नबी आझादांनी या स्नेहभोजनास जाण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, ट्रम्प आणि मोदी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय चर्चेत कराराच्या कागद पत्रांची देवाण-घेवाण होणार आहे.  तर 5 वाजता डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 3 अब्ज डॉलरच्या हॅलिकॅप्टर आणि मोठ्या सुरक्षा करारांची शक्यता आहे.

दरम्यान, ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प दिल्लीतील सरकारी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे, तर ट्रम्प यूएस दुतावासतील अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

कसा असेल आजचा कार्यक्रम?

डोनाल्ड ट्रम्प सकाळी 9.45 वाजता हॉटेल आयटीसी मौर्य येथून (Donald Trump India Visit) राष्ट्रपती भवनला जातील. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता राजघाटला भेट देतील. राजघाट येथून ते थेट इंडिया गेट येथील हैद्राबाद हाऊस जातील. दुपारी मेलानिया ट्रम्प नानकपुरामध्ये दिल्ली सरकारी शाळेला भेट देतील.

दरम्यान, हैद्राबाद हाऊसमधील बैठक संपल्यानंतर ट्रम्प दुपारी हॉटेल आयटीसी मौर्यला परततील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता ते डिनरसाठी राष्ट्रपती भवनला पोहोचतील. त्यानंतर रात्री 9.30 च्या जवळपास ट्रम्प आणि त्यांचा संपूर्ण ताफा इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. येथे ते अमेरिकेसाठी उड्डाण घेतील.