Vasai-Virar Municipal Corporation Budget 2021 | वसई-विरार महापालिका अर्थसंकल्प, करवाढ नाही, आरोग्य सुविधांवर भर

Vasai-Virar Municipal Corporation Budget 2021 | वसई-विरार महापालिका अर्थसंकल्प, करवाढ नाही, आरोग्य सुविधांवर भर
वसई विरार महानगरपालिका

वसई-विरार महानगर पालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा (Vasai-Virar Municipal Corporation Budget) अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे.

Nupur Chilkulwar

|

Mar 04, 2021 | 11:13 AM

वसई-विरार : वसई-विरार महानगर पालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा (Vasai-Virar Municipal Corporation Budget) अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांनी प्रशासक गंगाधरन डी. यांना 11 वा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. वसई-विरार महापालिकेच्या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. तर, कोव्हिड-19, तसेच इतर आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद देण्यात आली आहे (Vasai-Virar Municipal Corporation Budget For The Financial Year 2021-22 Presented).

वसई विरार शहर महानगरपालिका 2020-21 चा सुधारीत 1870.74 कोटी आणि सन 2021-22 चा मूळ 2000.28 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक गंगाधरण डी. यांना सादर केला.

वसई-विरार 2021-22 अर्थसंकल्पात काय?

– कोविड-19 मुळे रखडलेलया विकास कामांना गती मिळणार आहे. जुने रस्ते आता UTWT याने विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

– वसईचा किल्ला, वसईचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

– सुनियोजित पद्धतीने शहराच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

– मागासवर्गीय योजनांसाठी 29. 64 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भविष्यात पाण्याची कमतरता पडू नये यासाठी खोळसापाडा 1 आणि 2 धरण बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 231.90 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

– या अर्थसंकल्पात शहरातील कचऱ्याची समस्या सुटावी यासाठी पालिकेने विशेष जोर दिला आहे. यासाठी प्रशासनाने बायोमिथेन आणि बायोमायनिंगसाठी 147.54 कोटींचा प्रकल्प शासनाकडे सादर केला.

– सफाईसाठी यांत्रिक झाडू शहरात लवकरच येणार असल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.

– संकल्पना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेसाठी 10.48 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

Vasai-Virar Municipal Corporation Budget For The Financial Year 2021-22 Presented

संबंधित बातम्या :

VIDEO: दादा प्रेसमध्ये थोडेच बोलले, बोलले ते थेटच, हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून दाखवा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणे अशक्य?, नेमके कारण काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें