AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरातील महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधात विहिंपची तक्रार, विद्यार्थींना धार्मिक संदेश पाठवले

नागपूरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधात विश्व हिंदू परिषदेने पोलिसात तक्रार दिली आहे. या प्राध्यापकाने विद्यार्थींनी धार्मिक संदेश पाठवल्याचा आरोप होत आहे.

नागपूरातील महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधात विहिंपची तक्रार, विद्यार्थींना धार्मिक संदेश पाठवले
VHP files complaint against Nagpur professor
| Edited By: | Updated on: Oct 16, 2026 | 10:02 PM
Share

नागपुरातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकावर विद्यार्थिनींना आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आणि धार्मिक भावनांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करीत पर धर्म विशेषाची उपासना पद्धत आणि परंपरा पाळण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

नागपूरातील एका नामांकित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने काही विद्यार्थिनींना मेसेज पाठवले तसेच धर्म विशेषच्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे, त्या धर्मातील नियमांचे पालन करावे असेही सांगितल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे.आज विहिंपच्या एका शिष्टमंडळाने या विषयात ठोस कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी असा ही दावा केला आहे की यातील एका पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणासंदर्भात त्यांच्या संघटनेला संपर्क साधून आपली व्यथा मांडली.त्यानंतर विहिंपच्या शिष्टमंडळाने आधी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली. आणि त्यानंतर विहिपचे शिष्टमंडळ पोलीस पोलिस आयुक्तांनाही भेटले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी अजूनही पीडित विद्यार्थिनी, तिचे कुटुंबीय तसेच महाविद्यालय प्रशासन अशा कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

काय मागणी

* संबंधित प्राध्यापकावर तातडीने कारवाई करून महाविद्यालयातून हटवा

* महाविद्यालयाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये. जर आरोपी दोषी नाही तर एका पिडीत मुलीचे कुटुंबीय महाविद्यालयात जेव्हा चौकशीला गेले तेव्हा संबंधित प्राध्यापक हात जोडून माफी का मागत होता ? असा सवाल ही विहिंपने केला आहे.

* महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक पाऊल उचलावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा विहिंपने दिला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा