Vijay Shivtare : तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय; विजय शिवतारेंचा शिवसेनेवर पलटवार

Vijay Shivtare : तुमाने निरीक्षक म्हणून आले होते. तेव्हा बंड झालेलं नव्हतं. राज्याची परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीला 56 टक्के निधी, काँग्रेसला 26 टक्के निधी आणि आमचा मुख्यमंत्री असून केवळ 16 टक्के निधी आपल्याला. त्यामुळे काम कशी व्हायची.

Vijay Shivtare : तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय; विजय शिवतारेंचा शिवसेनेवर पलटवार
तुम्ही काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेना सोडलीय; विजय शिवतारेंचा शिवसेनेवर पलटवार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 10:47 AM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना नेते विजय शिवतारे (vijay shivtare) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेची (shivsena) या निर्णयाचा विजय शिवतारे यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार. मीच शिवसेना सोडली आहे. 29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. आम्हाला महाविकास आघाडी मान्य नाही. शिवसेनेने आघाडी तोडावी अशी भूमिका मी मांडली होती, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेत उभी फूट पडण्यास शिवसेना नेते संजय राऊतच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच सर्व काही घडत आहे. त्यांची उद्धव ठाकरेंबाबतची निष्ठा किती आणि शरद पवाारांबाबतची निष्ठा किती हे सर्वांना माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवतारे हे टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करतानाच संजय राऊतांवर हल्लाबोल केला.

29 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडली आहे. त्यात एकच गोष्ट होती. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही. उद्धव ठाकरेंनी आघाडी तोडावी सर्व काही ठिक होईल. एकनाथ शिंदे यांनी तेच सांगितलं होतं. मी माझी भूमिका स्पष्टच केली होती. माझी काय हकालपट्टी करणार. मीच सेनेतून बाहेर पडलो होतो, असं विजय शिवतारे म्हणाले.

हे राजकारण नाही

हे का करावं लागतंय. हे राजकारण नाही. यामागे मतदारसंघाबाबतचा भविष्यातील विचार आहे. माझ्या मतदारसंघात 2020पासून एअरपोर्टसह अनेक प्रश्न आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हे प्रश्न सोडवले गेले नाहीत. काम होत नाहीत. निधी मिळत नाही. त्यामुळे करायचं काय? असा आमदारांसमोर प्रश्न होता. त्यातून हा उद्रेक झाला आहे, असं ते म्हणाले.

शिवसेनेचे बडे पदाधिकारी फुटणार

तुमाने निरीक्षक म्हणून आले होते. तेव्हा बंड झालेलं नव्हतं. राज्याची परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीला 56 टक्के निधी, काँग्रेसला 26 टक्के निधी आणि आमचा मुख्यमंत्री असून केवळ 16 टक्के निधी आपल्याला. त्यामुळे काम कशी व्हायची. मतदारसंघाचा विचार करत नसाल आणि निधीतील असमानता दूर केली नाही तर आम्ही पर्याय शोधू हे आम्ही त्यांना दीड दोन महिन्याआधीच सांगितलं होतं. त्यावेळी मतदारसंघाच्या दृष्टीने काही ना काही तरी निर्णय घेतला पाहिजे असा आम्ही ठराव केला होता. आमच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रश्न होता. शिंदेंच्या माध्यमातून हा स्फोट झाला. ही तर सुरुवात झाली आहे. पुढच्या काळात अनेक बडे शिवसेना पदाधिकारी शिंदें सोबत असतील. माझ्याही संपर्कात अनेक आहेत. माजी आमदारही त्यात आहे, असंही ते म्हणाले.