रोहित पवारांनी ऑडिओ क्लीप बाहेर काढली, आता भाजपाच्या आमदाराने खरं सांगून टाकलं; CET स्कॅमवर काय म्हणाले?

एमएचटी-सीईटी निकालातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून राजकीय वाद सुरू असतानाच विक्रम पाचपुते यांनी रोहित पवारांच्या दाव्याला उत्तर दिलं आहे. शिनगारे सरांसोबतच्या संभाषणातील काही भागच प्रसारित केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय होती, हे संपूर्ण ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट होत असल्याचंही पाचपुते यांनी सांगितलं.

रोहित पवारांनी ऑडिओ क्लीप बाहेर काढली, आता भाजपाच्या आमदाराने खरं सांगून टाकलं; CET स्कॅमवर काय म्हणाले?
Vikram Pachpute Statement
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 10:24 PM

सीईटी परीक्षेच्या निकालात पैशांच्या जोरावर फेरफार होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी यावेळी काही ऑडिओ क्लिप आणि शिक्षकांचे स्टिंग ऑपरेशन केलेले दाखवले. निकाल सेट करण्यासाठी 25 लाख रुपये मागितले जात असल्याचा शिक्षकांचा दावा त्यांनी मांडला. या प्रकरणात थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बोट ठेवत रोहित पवारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आता या प्रकरणातील ऑडिओ क्लिपमधील संभाषण करणारे आमदार विक्रम पाचपुते समोर आले आहेत. त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, आमदार रोहित पवारांकडून माझ्या आणि शिनगारे सरांच्या संभाषणामधील भाग सोयीस्कर भाग प्रसारित करण्यात आला असल्याचं विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे. शिक्षकांनी MHT-CET मध्ये केलेल्या घोटाळ्यांच्या दाव्यांचा तपास व्हावा, असं मुख्यमंत्र्यांचं मत असल्याचं मी म्हणालो आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले विक्रम पाचपुते?

माझ्यामध्ये आणि शिनगारे सरांमध्ये जे संभाषण झालं त्याचा सोयीस्कर भाग प्रसारित करुन रोहित पवार म्हणत आहेत की, मुख्यमंत्र्यांना सुद्धा मान्य आहे की, असे फ्रॉड झाले तसे झाले, असा दावा करत आहेत. माझं म्हणणं आहे, संपूर्ण ऑडिओ क्लिपमध्ये आहे. माझ्या आणि शिनगारे सरांच्यामध्ये जे संभाषण झालं आहे. त्यामधून सगळं स्पष्ट होतं. आपण जे काही दावे करता आहात, तो मुख्यमंत्र्यांना मान्य आहे, म्हणजे यामध्ये शंका घेण्यासाठी काही तरी आहे. त्यामुळे याचा तपास झाला पाहिजेस हे मुख्यमंत्र्यांचं मत आहे. त्यासाठी एसआयटी लागली, तुम्ही थोड्याशा भागावरनं काहीतरी निष्कर्ष काढणं हे काही योग्य नाही, असं स्पष्टीकरण विक्रम पाचपुते यांनी दिलं आहे.

Loading...

दरम्यान, रोहित पवारांनी राज्याचा सीईटी सेल हा भ्रष्टाचाराचा सेल झाला असल्याचा आरोप केला. या सेलच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना कसे प्रवेश दिले जातात याचं शिक्षक मंडळींनी केलेलं स्टींग ऑपरेशन आमच्याकडे आहे. त्यांनी ते PPT च्या माध्यमातून मुंबईत पत्रकार परिषदेत दाखवलंही. यामध्ये टेंडर कसे मॅनेज केले जातात, पैसे घेऊन ऍडमिशन करून देण्याची खात्री कशी दिली जाते, सेंटर कसे मॅनेज केले जातात, या बाबी सविस्तर दाखवण्यात आल्या. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us