AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या, संजय राऊतांनी ललकारले

"संजय राऊत यांच्याकडे भाजपच्या 100 नेत्यांची यादी असेल तर त्यांनी ईडीला जरूर द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो", या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. (we can send to the ED a list of 120 people of bjp says sanjay raut)

भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या, संजय राऊतांनी ललकारले
| Updated on: Nov 25, 2020 | 11:34 AM
Share

मुंबई:संजय राऊत यांच्याकडे भाजपच्या 100 नेत्यांची यादी असेल तर त्यांनी ईडीला जरूर द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो”, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. “आधी तुम्हाला काय चौकश्या करायच्या त्या करून घ्या. मग तुमच्या 100 नव्हे 120 नेत्यांची यादी देतो. त्यांच्याही चौकश्या होऊनच जाऊ द्या”, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे. (we can send to the ED a list of 120 people of bjp says sanjay raut)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सरनाईक यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. तुमच्या सर्व चौकश्या पूर्ण होऊ द्या. शंभरच काय 120 नेत्यांची यादी देतो. ईडी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे ही यादी पाठवतो. मग बघतो ईडी कुणाला चौकशीला बोलावते, असं राऊत म्हणाले.

सध्या देशात सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण सुरू आहे. दबावतंत्राचं राजकारण सुरू आहे. आता तुम्ही पत्ते पिसताय पण लक्षात ठेवा डाव आम्ही जिंकू, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काहीही संबंध नाही. मराठी माणसाने उद्योग करणे हा केंद्रीय सरकारला गुन्हा वाटतो का? असा सवाल करतानाच व्यवसाय-उद्योग करणाऱ्या मराठी माणसावर चौकशा लावाल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहील, असा इशाराही त्यांनी दिला. चौकशीला कुणीही घाबरत नाही. आता तुम्ही घाबरा. महाराष्ट्रात आमची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असा इशारा राऊत यांनी दिला.

“सत्य बोलणं, पक्षाशी प्रामाणिक राहणं, ही सगळ्यात मोठी चूक सध्या मानली जात आहे. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही घाबरत नाही. दहा हजार कोटींचे घोटाळे करुन काही जण देशातून पळून जात आहेत. काहींची संपत्ती एक कोटींवरुन पाच हजार कोटींवर पाच वर्षांत पोहोचते. पण ईडी त्यांची चौकशी करत नाही. मात्र महाराष्ट्रात प्रमुख नेते, त्यांच्या मुलांना दबावात आणले जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. (we can send to the ED a list of 120 people of bjp says sanjay raut)

संबंधित बातम्या:

Pratap Sarnaik ED Live | प्रताप सरनाईक आणि मुलगा विहंगची एकाचवेळी चौकशी

ईडीचं उत्खनन हडप्पा-मोहेंजोदारोपर्यंत, ईडीच्या नोटीसची वाट पाहतोय, संजय राऊतांचा टोला

जेवढ्या चौकशा करायच्या तेवढ्या करा, महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा; राऊतांचा इशारा

(we can send to the ED a list of 120 people of bjp says sanjay raut)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.