विरोधकांच्या छाताडावर नाचत असणाऱ्या नेत्या कोण, शरद कोळी यांनी सांगितलं

शिवसेनेच्या आणि वैशाली ताईच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आल्यास तुम्हाला बारा बैलाचा नांगर लावल्याशिवाय सोडणार नाही, असंही शरद कोळी म्हणाले.

विरोधकांच्या छाताडावर नाचत असणाऱ्या नेत्या कोण, शरद कोळी यांनी सांगितलं
युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 11:12 PM

जळगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रोबधन यात्रा आज झाली. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी चांगली फटकेबाजी केली. यावेळी शरद कोळी यांचेही तुफान भाषण झाले. शरद कोळी म्हणाले, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. उद्धव ठाकरे यांना धोका दिला गेला. त्याचं पाप धुण्याचे काम तुम्हाला करायचं आहे.

शरद कोळी यांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांचा शरद कोळी यांनी आमदार म्हणून उल्लेख केला. दादागिरी आणि छफरीगिरी करायचं बंद कर. आम्ही जर दादागिरी सुरू केली तर तुला घराच्या बाहेर पडू देणार नाही, असा सज्जड दमही दिला.

आयच्या गावात HMT टॅक्ट्रर हाय. तुला काही लाच लज्जा हाय का. आता दोन-चार मिनिटात तुझ्या अंगावरचे कपडे उतरले जाणार आहेत. तू गेलं तर बरं झालं रे बाबा. अशा शब्दात शरद कोळी यांचा शिंदखेडच्या आमदार किशोर पाटील यांच्यावर घणाघात केला. शिवसेनेच्या अंगावर यायचं नाही, तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा सज्जड दमही दिला.

शिवसेनेच्या आणि वैशाली ताईच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आल्यास तुम्हाला बारा बैलाचा नांगर लावल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, असंही शरद कोळी म्हणाले. गद्दाराला याच मातीत गाळणार. वैशालीताई तुमचे वडील असते, तर गद्दाराला मुस्कळ्या हाणल्या असत्या. बहिणीला लई माया असते. वैशालीताईंच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आल्यास तुम्हाला बारा बैलांचा चौऱ्या नांगर लावल्याशिवाय सोडणार नाही, असा घणाघात शरद कोळी यांनी केला.

आमदाराचे बगलबच्चे काही गावात अन्याय करतात. अरे दादागिरी करायचे बंद कर. आम्ही दादागिरी केली तर तुला घराबाहेर पडणं बंद करावं लागेल. सांगून ठेवतो शिवसैनिकांच्या नादाला लागायचं नाही. बांडगुळांना वाटत असेल हे गप्प आहेत. पण, तसं काही नाही. हे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे आहेत.