मोदींच्या कामाचा 'हिशेब' मांडण्यासाठी पुण्यात काँग्रेसचे हटके पोस्टर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा ‘हिशेब’ मांडण्यासाठी काँग्रेसने पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजप सरकारने कशाप्रकारे जनतेची दिशाभूल केली आहे आणि जनतेला कशाप्रकारे सरकारच्या धोरणाचा फटका बसतो आहे, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसने पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात 4 ते 6 डिसेंबर दरम्यान पोस्टर प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सोशल मीडियावरुन प्रदर्शन पाहण्यासाठी …

मोदींच्या कामाचा 'हिशेब' मांडण्यासाठी पुण्यात काँग्रेसचे हटके पोस्टर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा ‘हिशेब’ मांडण्यासाठी काँग्रेसने पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजप सरकारने कशाप्रकारे जनतेची दिशाभूल केली आहे आणि जनतेला कशाप्रकारे सरकारच्या धोरणाचा फटका बसतो आहे, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसने पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात 4 ते 6 डिसेंबर दरम्यान पोस्टर प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सोशल मीडियावरुन प्रदर्शन पाहण्यासाठी जनतेला आमंत्रण दिले जाते आहे. हे आमंत्रणही हटके पद्धतीने दिले जात आहे.

लय झाली मन की बात येऊन पहा काम की बात“, “60 वर्षात भारतात ‘काहींच’ झालं नाही? जे झालं ते 2014 नंतरच? पुरावा हवाय, तर मग या!“, “विकास! विकास!! विकास!!! अपनी आखोंसे देखो किसने किया विकास?“, अशा आशयाची पोस्टर्स सध्या पुण्यात लावण्यात आली आहेत. शिवाय, सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाली आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम म्हणत असतात की, 60 वर्षात काहीच झाले नाही. तर जनतेला सांगायला हवं की, 60 वर्षात काय झालं आणि 2014 नंतर काय झालं. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, जनतेने अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, म्हणून आमदार मोहन जोशी यांच्या संकल्पनेतून हटके पद्धतीने पोस्टर छापून आम्ही जनतेला आमंत्रण दिले आहे.” असे टीव्ही 9 मराठीच्या डिजीटल टीमशी बोलताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हणुमंत पवार यांनी सांगितले.

कार्यक्रम नेमका आहे?

काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी हे दरवर्षी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन करतात. यावर्षी या सप्ताहात काँग्रेसने गेल्या 60 वर्षात या देशात केलेली प्रगती, पुण्याच्या विकासात काँग्रेसचे योगदान आणि सध्याचे मोदी सरकार स्वायत्त संस्थांची करत असलेली गळचेपी यावर एक पोस्टर प्रदर्शन आयोजित केले आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या आर्ट गॅलरीत उद्या (4 डिसेंबर 2018) सकाळी 11 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींच्या हस्ते होणार आहे. 4, 5 आणि 6 डिसेंबर या तीन दिवसात हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *