बारामतीकरांनी सोनं लुटलं, दसरा-दिवाळीत सोने खरेदीचा उच्चांक

बारामती शहर आणि तालुक्यामधील नागरिकांनी दसरा ते दिवाळीदरम्यान सुमारे 15 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे.

बारामतीकरांनी सोनं लुटलं, दसरा-दिवाळीत सोने खरेदीचा उच्चांक
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 4:35 PM

बारामती : दसरा-दिवाळीदरम्यान देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. या दिवसांमध्ये देशात दरवर्षी सोने (Gold) खरेदी-विक्रीचे मोठ-मोठे आकडे पाहायला मिळतात. यंदा या सणांवर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे दरवर्षीपेक्षा काहीशा कमी प्रमाणात सोने विक्री झाली आहे. परंतु देशातील काही ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांनी सोन्याची लूट केली (Gold market turnover) आहे. यंदा दसरा ते दिवाळीदरम्यान बारामतीकरांनी 15 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे. (Gold worth Rs 15 crore sold in Baramati, Gold market witnessed huge turnover between Dussehra and Diwali)

बारामती शहर आणि तालुक्यामध्ये दसरा ते दिवाळीदरम्यान नागरिकांनी सुमारे 15 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे. सोन्याचे भाव स्थिर राहिल्याने गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोने खरेदीकडे ग्राहक पाठ करतील, असे अंदाच वर्तवले जात होते, परंतु दिवाळीत सोन्याची किंमत एक हजार रुपयांमपर्यंत कमी झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. तसेच दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत असल्याने दिवाळीचा मुहूर्त साधत अनेकांनी या मुहूर्तावर दागिने खरेदी केल्याने सराफा बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे, असे बारामती सराफ असोशियनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.

धनत्रयोदशीच्या दिवशी पुण्यात सोनं खरेदीसाठी झुंबड

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला धनत्रयोदशीचा दिवस सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी पुण्यासह बारामतीत सोने बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. या दिवशी पुण्यात सोन्याचे दर प्रतितोळ्यासाठी 53 हजार, तर चांदीचे दर किलोसाठी 63500 रुपये होते. विशेष म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण झाली होती. यामुळे दिवाळीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. त्यामुळेच सोन्याच्या विक्रीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खातरजमा करा

तुम्ही दागिने विकत घेत असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना, याची खात्री करा. कारण सोनं विकताना हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा.

संबंधित बातम्या

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

दीड वर्षांपासून लपाछपीचा खेळ, नागपूर पोलिसांनी वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 20 लाखांचं चोरी केलेलं सोनं जप्त

(Gold worth Rs 15 crore sold in Baramati, Gold market witnessed huge turnover between Dussehra and Diwali)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....