पुण्यात अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून जळालेल्या नोटा

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू असल्याने दोन दिवस बँकांना सुट्टी आहे. याचाच ताण एटीएमवरती पडला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ऐन दिवाळीत अनेक एटीएम मशिनमधील पैसे संपले आहेत. त्यामुळे एटीएममध्ये खडखडाट आहे. अशातच अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क जळालेल्या नोटा आल्याचं समोर आलंय. अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे असल्याचं समजताच लोकांनी पैसे …

, पुण्यात अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून जळालेल्या नोटा

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू असल्याने दोन दिवस बँकांना सुट्टी आहे. याचाच ताण एटीएमवरती पडला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ऐन दिवाळीत अनेक एटीएम मशिनमधील पैसे संपले आहेत. त्यामुळे एटीएममध्ये खडखडाट आहे. अशातच अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क जळालेल्या नोटा आल्याचं समोर आलंय.

अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे असल्याचं समजताच लोकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. पण ग्राहकांची घोर निराशा झाली. अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे तर आले, पण ते जळालेल्या अवस्थेत होते हे पाहून ग्राहकांना धक्काच बसला.

अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास दोन हजारांच्या नोटा जळालेल्या होत्या. या नोटा ऐन दिवाळीत नागरिकांच्या हातात पडल्याने मोठी तारांबळ उडाली. या जळालेल्या नोटा कुणीही घेत नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात त्रास सहन करावा लागला.

बँकांनाही सुट्टी असल्याने तक्रार कुणीकडे करायची असा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतोय, कारण दुसरीकडे बँकाही बंद आहेत. ऑनलाईन व्यवहार प्रत्येकवेळी शक्य होत नाही. त्यात अॅक्सिस बँकेच्या एटीएममधील हा प्रकार संताप आणणारा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *