AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोरोनाबळींची संख्या वाढली, दिवसभरात तिघांचा मृत्यू

पुण्यात आणखी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबळींची संख्या 78 वर पोहोचली (Pune Corona Patient Died) आहे.

पुण्यात कोरोनाबळींची संख्या वाढली, दिवसभरात तिघांचा मृत्यू
| Updated on: Apr 27, 2020 | 5:46 PM
Share

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना (Pune Corona Patient Died) दिसत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 342 कोरोनाबळी गेले आहेत. पुण्यात कोरोनाने आज (27 एप्रिल) तीन जणांचे बळी घेतले आहे. या दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबळींची संख्या वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या (Pune Corona Patient Died) एका महिलेचा आज (27 एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला 18 एप्रिलला कोरोनाचे निदान झालं. त्यानंतर तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या महिलेला मधुमेह, लठ्ठपणा हेही आजार होते. या महिलेची तब्येत अचानक खालावली. त्यानंतररात्री 12.30 च्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पुण्यात आज 64 आणि 48 वर्षीय महिला, तर 38 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही मृत्यू ससून रुग्णालयात झाले आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा 8० वर गेला आहे. यात पुणे शहर आणि ग्रामीणमधील 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यात रविवारी (26 एप्रिल) 80 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. यामुळे पुण्यातील एकूण रुग्णांचा आकडा 1 हजार 264 वर पोहचला आहे. तर दिवसभरात पाच कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

पुण्यात सध्या कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 902 इतकी झाली आहे. यापैकी 367 रुग्णांवर नायडू रुग्णालयात, 28 रुग्णांवर ससूनमध्ये, तर इतरांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. काल दिवसभरात पुण्यात 6 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 165 झाली आहे.

पुणे शहरात 26 एप्रिलपर्यंत 1149 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. भवानी पेठेतील रुग्णसंख्या एका दिवसात तब्बल 31 ने वाढली आहे. इथे आता 245 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. भवानी पेठेसह शिवाजीनगर  घोलेरोड, कसबा विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड आणि येरवडा धानोरी या पाच वॉर्डमध्ये रुग्णसंख्या शंभरीपार गेली (Pune Corona Patient Died) आहे.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 68, कोठे किती रुग्ण?

‘कोरोना’शी झुंजताना प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!