मी टू आणि एल्गार परिषदेमुळे न्या. कोळसे पाटलांना अभाविपचा विरोध

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात युवाजागर व्याख्यानमाला वादग्रस्त ठरली. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्तानं व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. काही विद्यार्थी संघटनांनी या व्याखानाचं आयोजन केलं होतं. माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांचं भारतीय राज्यघटनेवर  व्याख्यान होतं. या व्याख्यानाला महाविद्यालयानंही परवानगीही दिली होती. मात्र कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारल्यानं […]

मी टू आणि एल्गार परिषदेमुळे न्या. कोळसे पाटलांना अभाविपचा विरोध
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात युवाजागर व्याख्यानमाला वादग्रस्त ठरली. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्तानं व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. काही विद्यार्थी संघटनांनी या व्याखानाचं आयोजन केलं होतं. माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांचं भारतीय राज्यघटनेवर  व्याख्यान होतं. या व्याख्यानाला महाविद्यालयानंही परवानगीही दिली होती. मात्र कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारल्यानं विद्यार्थी अक्रमक झाले.

यानंतर आयोजक विद्यार्थ्यांनी फर्ग्युसनच्या प्रांगणात व्याख्यानाचा निश्चय केला.  मात्र अभाविप समर्थक विद्यार्थ्यांनी विरोध करत कोळसे पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. अखेर कोळसे पाटील यांनी या गोंधळातच व्याख्यान दिलं.

या प्रकरणी आयोजकांनी रितसर परवानगी घेतल्याचं सांगितलंय. घटनेनं सर्वांना बोलण्याचा अधिकार असल्यानं, विरोध अयोग्य असल्याचं म्हटलंय. बहुजनांची मुस्कटदाबी होत असल्याचा पुरोगामी विचारधारेच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे.

तर विरोधक अभाविप समर्थक विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेला विरोध नाही, मात्र व्याख्यात्यांना विरोध असल्याचं म्हटलं आहे. कोळसे पाटील यांचा वादग्रस्त एल्गार परिषद आयोजित करण्यात सहभाग होता. त्याचबरोबर त्यांच्यावर मीटू मोहिमेत एका महिलेनं आरोप केला आहे. त्यामुळं आमचा त्यांना विरोध आसल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचं भाषण

यावेळी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी आपल्या भाषणात लोकशाहीची मूल्यं समजावून सांगितली. “लोकशाहीसाठीचा समता हा पाया आहे. समता नसल्याने लोकशाही नांदत नाही. संविधानाचा समता हा गाभा आहे. माणूस म्हणून जगता आले पाहिजे ही लोकशाही आहे. मात्र सध्या लोकशाहीचा पाया खिळखिळा करण्यात येत आहे. जातीयता आणि सामाजिक विषमता राहील तोपर्यंत लोकशाही नाही. लोकशाहीसाठी विषमता दूर करावी लागेल.  संविधान आणि अहिंसेची मुस्कटदाबी होत आहे. त्यासाठी संगटन हवं आहे. मी खरं बोलणारच. मोदी सत्तेवर आल्यानं देशाचं वाटोळे केलं. बँका डबघाईला आल्या आहेत. विज्ञानाची कास धरुन संविधानाचं अनुकरण केले पाहिजे”, असं न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला अभाविपचा विरोध

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.