न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला अभाविपचा विरोध

पुणे: मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या फर्ग्युसन कॉलेजमधील व्याख्यानाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपने विरोध केला. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत युवाजागर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यघटना1950 ते 2018 हा या व्याख्यानाचा विषय होता. या विषयावर न्यायमूर्ती कोळसे पाटील व्याखान देणार होते, मात्र अभाविपच्या विरोधामुळे कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे. […]

न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला अभाविपचा विरोध
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

पुणे: मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या फर्ग्युसन कॉलेजमधील व्याख्यानाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपने विरोध केला. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत युवाजागर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यघटना1950 ते 2018 हा या व्याख्यानाचा विषय होता. या विषयावर न्यायमूर्ती कोळसे पाटील व्याखान देणार होते, मात्र अभाविपच्या विरोधामुळे कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत कोळसे पाटील यांचं व्याख्यान नियोजित आहे.

पण अभाविपने विरोध केल्याने आता न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचं व्याखान होणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

विद्यार्थी संघटनांनी या व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बी जी कोळसे पाटील व्याखान देणार आहेत. तशी तयारी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. या कार्यक्रमाला कॉलेज प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. मात्र आता अभाविपने विरोध केल्याने कॉलेज प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सध्या फर्ग्युसन कॉलेजमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. अभाविपच्या विरोधामुळे कार्यक्रमही रद्द होण्याची शक्यता आहे.

आयोजकांचा इशारा

या व्याख्यानासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाचे रविंद्रसिंह परदेशी यांनी पत्र पाठवून कोळसे पाटील यांना आमंत्रित केले होते. मात्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ऐनवेळी कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला परवानगी नाकारल्याचा आरोप आहे. सभागृहात व्याख्यानासाठी परवानगी घेतली आहे. त्यामुळं आम्हाला सभागृहाची परवानगी द्यावी, अन्यथा फर्ग्युसन आवारात कार्यक्रम घेण्याचा इशारा, आयोजकांनी दिला.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.