Astrology 2025 : देवगुरू बृहस्पती 24 तासानंतर जाणार अस्ताला, या राशींनी राहावं सावध

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळात ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा राशीचक्रावर परिणाम होतो. देवगुरु बृहस्पतीची स्थिती 12 जूनला बदलणार आहे. यामुळे काही राशींना लाभ तर काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊयात याबाबत..

Astrology 2025 : देवगुरू बृहस्पती 24 तासानंतर जाणार अस्ताला, या राशींनी राहावं सावध
गुरु ग्रह अस्ताला जाणार
| Updated on: Jun 11, 2025 | 3:04 PM

ज्योतिषशास्त्राची भाकीतं ही ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. जन्मावेळी असलेली ग्रहांची स्थिती, ग्रहांची महादशा आणि गोचर कुंडलीवर सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे गोचर कुंडलीतील ग्रहांची स्थिती बदलली की वैयक्तिक कुंडलीवर परिणाम दिसून येतो. ग्रहमंडळात प्रत्येक ग्रहाचं कार्य दिलं गेलं आहे. त्यानुसार फळं मिळतात. देवगुरु बृहस्पतीच्या स्थितीत 12 जूनला बदल होणार आहे. सध्या देवगुरु बृहस्पती हा मिथुन राशीत आहे. 12 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी अस्ताला जाणार आहे. यामुळे काही जातकांवर शुभ प्रभाव पडण्याची शक्यता कमीच आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह अस्ताला गेल्याने त्याचा प्रभाव राशीचक्रावर पडेल. तसेच मानवी जीवनातही काही घडामोडी घडतील. गुरु ग्रह अस्ताला जाणार असल्याने पाच राशीच्या जातकांना सावध राहणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात त्या राशींबाबत…

या राशींच्या जातकांनी राहावं सावध

मेष : देवगुरू बृहस्पती मेष राशीच्या तिसऱ्या स्थानात अस्ताला जाणार आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना सावध राहणं गरजेचं आहे. जीवनात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. गुरुबळ कमी झाल्याने हा फटका बसू शकतो. या कालावधीत सावधपणे वागणं फायदेशीर ठरेल. व्यसनाच्या आहारी जाणं टाळायला हवं.

मिथुन : या राशीत सध्या गुरु ग्रह असून अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांच्या स्वभावात चिडचिडेपणा दिसून येईल. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आक्रमकतेमुळे नाती दूरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बालोताना काळजी घेणं गरजेचं आहे.

सिंह : या राशीच्या एकादश भावात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या. तसेच उसनवारीने पैसे देणे टाळा. अन्यथा दिलेले पैसे परत मिळणं कठीण होईल.

वृश्चिक : या राशीच्या अष्टम भावात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. यामुळे या राशीच्या जातकांना आरोग्याशी निगडीत समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. काही कामं होता होता राहतील. या कालावधीत कोणालाही क्षमतेबाहेरचा शब्द देऊ नका.

मकर : या राशीच्या षष्टम स्थानात गुरु ग्रह अस्थाला जाणार आहे. यामुळे अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो. शत्रूपिडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतंही कार्य हाती घेण्यापूर्वी गुरुबळ नाही याची काळजी घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)