AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2025 : जून महिन्यात गुरुच्या स्थितीमुळे तीन राशींचं नशिब फळफळणार, असा मिळेल फायदा

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची असते. ग्रहांनी राशीबदल किंवा स्थितीत बदल झाला तर राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. गुरु ग्रह जून महिन्यात अस्ताला जाणार आहे. त्यामुळे तीन राशींचं भलं होणार आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

Astrology 2025 : जून महिन्यात गुरुच्या स्थितीमुळे तीन राशींचं नशिब फळफळणार, असा मिळेल फायदा
गुरु ग्रह
| Updated on: May 08, 2025 | 3:05 PM
Share

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचं महत्त्व आहे. ग्रहमंडळातील सर्वात मोठा ग्रह म्हणून ख्याती आहे. यावरून गुरु ग्रहाचं कुंडलीत चांगल्या स्थितीत असणं महत्त्वपूर्ण ठरतं. गुरु ग्रहाला ज्ञान, धन, संतान आणि धर्माचा कारक मानलं जातं. त्यामुळे गुरु ग्रहाची स्थिती बदलली तर राशीचक्रावर त्याचा परिणाम होतो. गुरु ग्रहाने जवळपास एका वर्षाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता राशी बदल केल्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात गुरु ग्रहाच्या स्थितीत बदल होणार आहे. गुरु ग्रह 12 जूनला संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीत अस्ताला जाणार आहे. जवळपास गुरु ग्रहाची 27 दिवस अशी स्थिती असणार आहे. गुरू ग्रहाला 9 जूनला पुन्हा एकदा तेज प्राप्त होईल. पण हे 27 दिवस काही राशींसाठी चांगले जाणार आहेत. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या…

मेष : या राशीच्या तिसऱ्या स्थानात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना याची चांगली फळं मिळतील. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले नकारात्मक परिणाम दूर होतील. कौटुंबिक पातळीवर चांगले संबंध प्रस्थापित होतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली सरकारी कामं मार्गी लागतील. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळेल. नशिबाची साथही मिळेल.

धनु : या राशीच्या नवव्या म्हणजेच भाग्य स्थानात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. गुरुची स्थिती या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. काही कामं चुटकीसरशी पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढ झाल्याचं दिसून येईल. समाजात मानसन्मान मिळेल. पण या कालावधीत लांबचा प्रवास करणं टाळा. या कालावधीत शत्रूपीडा काही अंशी कमी होऊ शकते.

वृषभ : या राशीच्या दुसऱ्या स्थानात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. धनस्थान असल्याने या स्थितीचा या राशीला फायदा होईल. या राशीच्या जातकांना चांगले परिणाम अनुभवण्यास मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. खासकरून अडकलेले पैसे परत मिळतील. इतकंच काय तर जीवनात सुख समृद्धी येऊ शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर