Astrology: राशींनुसार करा मंत्रांचा जप; 12 राशींसाठी स्वतंत्र मंत्र, या रंगाच्या वस्त्राचे करावे दान

| Updated on: Jul 14, 2022 | 4:32 PM

ज्योतिष या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योतिमध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय. जोतिषशास्त्रात (Astrology) 12 राशींचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक राशीचा स्वामीग्रह असतो त्या ग्रहांच्या […]

Astrology: राशींनुसार करा मंत्रांचा जप; 12 राशींसाठी स्वतंत्र मंत्र, या रंगाच्या वस्त्राचे करावे दान
राशी भविष्य
Image Credit source: Social Media
Follow us on

ज्योतिष या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योतिमध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय. जोतिषशास्त्रात (Astrology) 12 राशींचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक राशीचा स्वामीग्रह असतो त्या ग्रहांच्या स्वभावानुसार एखाद्या राशीचे गुण असतात. आपण प्रत्येक राशीनुसार त्याचे लाभदायक मंत्र आणि कुठल्या रंगाचे वस्त्र दान करावे याबद्दल जाणून घेऊया.

 

  1. मेष राश‍ी- ओम अव्ययाम नम:’ या मंत्राचा जप करा आणि रविवारी लाल रंगाचे वस्त्र दान करा.
  2. वृषभ राश‍ी- ‘ओम जीवाय नम:’ या मंत्राचा जप करा आणि  गुरुवारच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र भेट म्हणून द्या.
  3. हे सुद्धा वाचा
  4. मिथुन राश‍ी- ‘ओम धिवराय नम:’ या मंत्राचा जप करा आणि बुधवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र भेट म्हणून द्या.
  5. कर्क राश‍ी- ओम वरिष्ठाय नम:’ या मंत्राचा जप करा आणि शुक्रवारच्या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र दान करा.
  6. सिंह राश‍ी- ‘ओम स्वर्णकायाय नम:’ या मंत्राचा जप करा आणि हिरव्या रंगाची वस्त्र दान करा.
  7. कन्या राश‍ी- ‘ओम हरये नम:’ या मंत्राचा जप करा आणि हिरव्या, पांढऱ्या रंगाचे कपडे गरजूंना दान करा.
  8. तूळ राश‍ी- ‘ओम विविक्ताय नम:’ या मंत्राचा जप करा आणि खादी कपडे भेट म्हणून देऊ शकता.
  9. वृश्चिक राश‍ी- ‘ओम जीव नम:’ या मंत्राचा जप करा आणि कापड भेट म्हणून देऊ शकता.
  10. धनु राश‍ी- ‘ओम जेत्रे नम:’ या मंत्राचा जप करा आणि सोने भेट देऊ शकता.
  11. मकर राश‍ी- ‘ओम गुणिने नम:’ या मंत्राचा जप करा आणि तांब्याचे वस्तू आणि वस्त्र भेट म्हणून द्या.
  12. कुंभ राश‍ी- ‘ओम धीवराय नम:’ या मंत्राचा जप करा आणि लोकरीचे कपडे अर्पण करा.
  13. मीन राश‍ी- ‘ओम धीवराय नम:’ चा जप करा आणि केसरी रंगाचे कपडे भेट म्हणून द्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)