Astrology: या सहा राशींसाठी डिसेंबर महिना जाणार जड, खिशावर पडणार अधिक भार

| Updated on: Dec 01, 2022 | 11:50 AM

वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरु झाला आहे. हा महिना जोतिषशास्त्राच्या दृष्टीने असा असणार आहे जाणून घेऊया.

Astrology: या सहा राशींसाठी डिसेंबर महिना जाणार जड, खिशावर पडणार अधिक भार
जोतिषास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, 2022 चा शेवटचा महिना सुरु झाला आहे. हा महिना जोतिषास्त्राच्या (Astrology) दृष्टीने महत्त्वाचा आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. हळूहळू तुमचे उत्पन्न वाढू लागेल. खर्च राहू शकतात, परंतु उत्पन्न वाढल्यामुळे तुम्हाला आराम वाटेल. 16 तारखेला सूर्य जेव्हा अकराव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुमची आर्थिक स्थिती झपाट्याने वाढेल.

  1. मेष- वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये तुमचे खर्च तुमच्या आर्थिक स्थितीचे बजेट बिघडवू शकते. यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आव्हानाचा सामना करावा लागणार नाही. महिन्याचा पहिला आठवडा अधिक त्रासदायक ठरू शकतो. यानंतर, हळूहळू सुधारणा सुरू होईल.
  2. वृषभ – तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. डिसेंबरमध्ये तुम्हाला अचानक आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुमचे पैसे हुशारीने गुंतवा. या महिन्यात कोणतीही मोठी गुंतवणूक टाळणे चांगले होईल कारण ते बुडण्याची शक्यता जास्त आहे.
  3. मिथुन- एकीकडे तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत असतील, पण दुसरीकडे खर्चही जास्त होईल. आठव्या घरात शनिदेवाची उपस्थिती खर्च वाढण्याचे मुख्य कारण असेल. यामुळे तुमची मानसिक चिंताही वाढेल आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची चिंता वाटू लागेल.
  4. कर्क- या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे भरपूर पैसे येऊ लागतील.  दुसऱ्या घराचा स्वामी सूर्य पाचव्या भावात बसला असल्याने धनाची स्थिती प्रबल होईल. सरकारी क्षेत्रातूनही लाभ होण्याची शक्यता आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- तुमचा खर्च जास्त राहील आणि महिन्याच्या सुरुवातीपासून खर्चात वाढ होईल. यामुळे तुम्हाला थोडे लक्ष द्यावे लागेल.  परिणामी, तुमच्या आर्थिक स्थितीत चढ-उतार होऊ लागतील.
  7. कन्या- आर्थिक दृष्टिकोनातून अधिक अनुकूल नाही. पैशाची बचत करण्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुमचा खर्च जास्त असेल. आठव्या घरातील राहू अनावश्यक खर्च करण्यास सक्षम आहे, त्यामुळे थोडा विचार करूनच चालावे. या महिन्यात बजेट तयार करा आणि नियोजनासह खर्च करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)