Astrology : पत्रिकेत चंद्र कमजोर असल्यास करावा लागतो या आजारांचा सामना, जोतिषशास्त्रात सांगितले आहेत उपाय

जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर ती व्यक्ती मनाने अत्यंत कमकुवत असते आणि अति भावनिक होऊन निर्णय घेऊ शकते.

Astrology : पत्रिकेत चंद्र कमजोर असल्यास करावा लागतो या आजारांचा सामना, जोतिषशास्त्रात सांगितले आहेत उपाय
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 07, 2023 | 2:58 PM

मुंबई : हिंदू ज्योतिषशास्त्रात (Astrology) चंद्र हा मनासाठी व भावनांसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. हा संवेदनशील लोकांचा अधिपती ग्रह आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर ती व्यक्ती मनाने अत्यंत कमकुवत असते आणि अति भावनिक होऊन निर्णय घेऊ शकते. ज्याच्या पत्रिकेत चंद्रदोष असतो ती व्यक्ती सतत आजारी पडते. या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपायही सांगण्यात आले आहेत. जेव्हा चंद्र कमजोर असतो तेव्हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत होते आणि भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ लागते. अशा लोकांना मानसिक आजार जडण्याचीही शक्यता असते. अशा लोकांना निद्रानाश, दमा, सर्दी, खोकला यासारखे आजार सतत होत असतात.

चंद्र शांतीसाठी हे उपाय करा

चंद्र ग्रहाच्या अनुकूलतेसाठी चंद्राच्या वैदिक मंत्राचा 11000 वेळा जप करावा. याशिवाय या मंत्राने संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करावे.

या मंत्राचा जप करा

वैदिक मंत्र

ॐ ओम देवा असपलग्वम् सुबध्वम् महते क्षत्रिय महते ज्येष्ठाय महते जनराज्येंद्रस्येंद्रिय । इम्मामुष्य पुत्रमनुष्यै पुत्र मस्यै विषेश वोमि राजा सोमस्माकम ब्राह्मणनाग्वम् राजा ।

तांत्रिक मंत्र

ॐ श्रं श्रीं श्रां सह चंद्रमसे नमः

ॐ पुत्र सोमाय नमः

सोमवारी उपवास करा

चंद्राच्या शांतीसाठी व्यक्तीने श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारपासून व्रत सुरू करावे. किमान 10 सोमवार आणि जास्तीत जास्त 54 सोमवार उपवास करावा.

या गोष्टी दान करा

सोमवारी मोती, चांदी, तांदूळ, मिसर, हळद, पांढरे वस्त्र, दक्षिणा, पांढरी फुले, शंख, कापूर, पांढरा बैल, पांढरे चंदन इत्यादी दान केल्याने कुंडलीतील चंद्र दोष शांत होतो. याशिवाय सोमवारी सकाळी पांढऱ्या बाभळीचे मुळ खोदून ते गंगाजलाने धुवून पांढऱ्या कपड्यात बांधावी व झोपताना उशीखाली ठेवावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)