Astrology: डिसेंबरमध्ये ‘या’ राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, शुक्राचे गोचर ठरणार लाभदायक

| Updated on: Nov 30, 2022 | 10:22 AM

डिसेंबरमध्ये ग्रहांच्या हालचालींचा काही राशींना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना येणाऱ्या काळात चांगले दिवस अनुभवायला मिळतील.

Astrology: डिसेंबरमध्ये या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, शुक्राचे गोचर ठरणार लाभदायक
शुक्र गोचर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ग्रहांच्या राशीतील बदल आणि त्यांच्या चालीमध्ये होणारा बदल खूप महत्त्वाचा असतो. ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्वच 12 राशींवर होतो. उद्याप्सून वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होणार आहे. सूर्यमालेतील प्रमुख ग्रह, सूर्य, बुध आणि शुक्र त्यांचे राशी बदलणार आहेत. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासून अनेक राशीच्या लोकांसाठी चांगला काळ येऊ शकतो.

जातकांसाठी बुध, शुक्र (Shukra Gochar) आणि सूर्य देवाची साथ मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये बुध तीन वेळा, शुक्र दोनदा आणि सूर्य एकदा बदलेल. 3 डिसेंबर 2022 रोजी बुध प्रथम धनु राशीत प्रवेश करेल आणि नंतर धनु राशी सोडून 28 डिसेंबर रोजी मकर राशीत जाईल. दुसरीकडे, 31 डिसेंबरपासून बुध पुन्हा धनु राशीत त्याच्या पूर्वगामी अवस्थेत प्रवेश करेल. कन्या राशीच्या लोकांना महिन्यातून तीनदा बुधाचे स्थान बदलण्याचा लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया ग्रहांच्या या राशी बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

  1. मेष- सूर्याच्या प्रभावामुळे तुमचे आजार दूर होतील. नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. तुम्ही व्यवसायात अनेक चांगले आणि उत्तम सौदे करू शकता. न्यायालयीन प्रकरणे निकाली निघणार आहेत.
  2. कर्क-  राजकारणात सक्रिय लोकांसाठी डिसेंबर महिना महत्त्वाचा असणार आहे. तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. समाजात तुमच्याबद्दल आदराची भावना वाढेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी पुढाकार घ्याल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. सिंह- डिसेंबरमध्ये केलेले प्रत्येक संक्रमण सिंह राशीसाठी फायदेशीर ठरेल. जुने व्यवहार पूर्ववत होऊ शकतात. हे चांगले उत्पन्न आणि अनपेक्षित आर्थिक नफा होण्याचे संकेत देते. परदेश प्रवासाची संधी मिळेल.
  5. तूळ- कामानिमित्त एखाद्या ठिकाणी जाण्याचा बेत तयार करा. तुमचा संपूर्ण महिना आनंददायी जाईल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य निरोगी राहील. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)