Diwali 2022: यंदाच्या दिवाळीत लागणार सूर्यग्रहण, या पाच राशींसाठी राहणार अशुभ

| Updated on: Oct 07, 2022 | 10:19 PM

यंदाच्या दिवाळीत येणारे चंद्र आणि सूर्य ग्रहण काही राशींची चिंता वाढविणारे आहेत. कोणत्या राशींवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया

Diwali 2022: यंदाच्या दिवाळीत लागणार सूर्यग्रहण, या पाच राशींसाठी राहणार अशुभ
ग्रहण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी जवळ आली आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. मात्र, दिवाळीला येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. वास्तविक, दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो आणि यावर्षी कार्तिक अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे. पण अमावस्या तिथी 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी असेल. अशा स्थितीत 24 तारखेच्या रात्री दिवाळी साजरी होणार असून 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी सूर्यग्रहण होणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 8 नोव्हेंबरला देव दिवाळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे.  सणांच्या दरम्यान येणारी ही दोन ग्रहणे पाच राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकतात.

  1. वृषभ – सणासुदीच्या काळात येणारे सूर्य आणि चंद्रग्रहण वृषभ राशीच्या लोकांसाठी अशुभ असेल. वृषभ राशीच्या लोकांना सूर्य आणि चंद्रग्रहण दरम्यान सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्याच्या बाबतीत गाफील राहू नये. दोन्ही ग्रहणांच्या कालावधी दरम्यान कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये.
  2. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांनाही सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या काळात काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान तुम्हाला नशिबाची साथ अजिबात मिळणार नाही. विविध कामांमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ होईल. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. तणावही वाढू शकतो.
  3. कन्या- 25 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर या राशीच्या लोकांनाही काळजी घ्यावी लागेल. कन्या राशीचा अनावश्यक खर्च वाढू शकतो. जर तुम्ही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते काही काळासाठी पुढे ढकला. या काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. या काळात उधारीचे व्यवहार करू नका.
  4. तूळ- सूर्यग्रहणापासून चंद्रग्रहणापर्यंत तूळ राशीच्या लोकांनाही सावध राहावे लागेल. या राशीवर  सर्वाधिक परिणाम होईल. तुमचा पैसा आणि संपत्ती कमी होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.  वाहन चालवताना काळजी घ्या.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  धनु राशी- धनु राशीच्या लोकांनाही  ग्रहण काळात सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. पैसा-पैशाच्या बाबतीत त्रास होऊ शकतो. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करा. उधारीचे व्यवहार टाळा. या काळात कोणतेही काम सुरू करण्याची योजना पुढे ढकलणे चांगले.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)