ऑक्टोबर ठरणार खास ! 8 आणि 11 तारखेला ग्रहांच्या चालीत बदल, ‘या’ राशींना मिळेल लाभ
ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या हालचालींमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. 8 आणि 11 ऑक्टोबरला गुरु आणि सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे काही राशींवर विशेष प्रभाव पडू शकतो. या काळात कोणत्या राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत, जाणून घेऊया.

ऑक्टोबर महिना ज्योतिषाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार असून, विशेषतः 8 आणि 11 ऑक्टोबरला होणारे नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचे ठरणार आहे. ८ ऑक्टोबरला गुरु अश्लेषा नक्षत्रात, तर ११ ऑक्टोबरला सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. याशिवाय शुक्र वक्री होणे, सूर्याचे राशी परिवर्तन, बुध वक्री होणे आणि महिन्याच्या अखेरीस गुरुचे राशी परिवर्तन असे बदलही होणार आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार या ग्रहबदलांचा परिणाम करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधांशी संबंधित बाबींवर होऊ शकतो.
8 ऑक्टोबरला गुरुचे नक्षत्र परिवर्तन
8 ऑक्टोबरला देवगुरु बृहस्पती अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, धन, शिक्षण, विवाह, संतती आणि भाग्याशी जोडला जातो. या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरी किंवा व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागण्याची तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीला आर्थिक लाभ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. तर कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरी किंवा कामाशी संबंधित प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.
11ऑक्टोबरला सूर्याचं नक्षत्र परिवर्तन
11 ऑक्टोबरला सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. सूर्याला मान-सन्मान, आत्मविश्वास, पद आणि नोकरीशी संबंधित ग्रह मानले जाते. मेष राशीच्या व्यक्तींना कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढून कामात ओळख मिळण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात.
ऑक्टोबरमध्ये आणखी ग्रहबदल
3 ऑक्टोबरला शुक्र वक्री, 17 ऑक्टोबरला सूर्य तुला राशीत आणि 24 ऑक्टोबरला बुध वक्री होणार आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबरला गुरु कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करतील. त्यामुळे ऑक्टोबरमधील ग्रहस्थितीतील हे बदल विविध राशींवर वेगवेगळा परिणाम करू शकतात.
या राशींवर होऊ शकतो प्रभाव
मेष, वृषभ, कर्क, कन्या, सिंह आणि धनु राशींवर ऑक्टोबरमधील ग्रहस्थितीचा विशेष प्रभाव दिसू शकतो. काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना खर्च आणि गुंतवणुकीबाबत अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागू शकतात.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)