AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Rashi Bhavishya : आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? तुमच्या राशीचं भविष्य वाचूनच करा दिवसाची सुरुवात!

Horoscope Today 17 October 2026: ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा विचार करून ज्योतिषशास्त्रात दैनंदिन राशिभविष्य सांगितले जाते. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी लकी ठरणार, कोणाला यश मिळणार आणि कोणत्या राशींनी सावध राहण्याची गरज आहे, जाणून घ्या.

Today Rashi Bhavishya : आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? तुमच्या राशीचं भविष्य वाचूनच करा दिवसाची सुरुवात!
Astrology
| Updated on: Oct 16, 2026 | 10:27 PM
Share

१७ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिवार असून, हिंदू धर्मात हा दिवस शनिदेव आणि हनुमानाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा सर्व १२ राशींवर वेगवेगळा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे काही राशींना नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे, तर काहींनी आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंधांबाबत सावध राहणे आवश्यक ठरू शकते. जाणून घ्या, शनिवारचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल.

मेष

सकारात्मक दिवस ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. कुटुंबातील समस्या दूर होऊन फिरायला जाण्याचे प्लॅन कराल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यातील जवळीक वाढेल.

वृषभ

दानधर्म आणि धार्मिक कार्यांसाठी दिवस अनुकूल दिवस. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन

काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होऊ शकतात. आर्थिक नियोजन बिघडू शकते. अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल.

कर्क

घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. पूर्वी झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्या. करिअरच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. नात्यातील समस्या संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक परिस्थिती फारशी अनुकूल नसेल. गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेणे टाळा.

सिंह

करिअरविषयी चिंता वाढू शकते. मन शांत ठेवून परिस्थितीचा विचार करा. गुंतवणुकीच्या नवीन संधींकडे लक्ष द्या. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य माहिती मिळवा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी कुटुंबीयांचा सल्ला घ्या. बोलताना संयम ठेवणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल.

कन्या

धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता काम आणि विश्रांती यांचा समतोल राखा.

तूळ

घरातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्या. करिअरच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. जोडीदारासोबत किंवा जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद झाल्यास शांतपणे चर्चा करून सोडवा. गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरू शकते.

वृश्चिक

कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. कुटुंबातील अडचणी दूर होऊन घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजनही करू शकता. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात प्रेम आणि जवळीक वाढेल.

धनु

आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. घरातील लहान भाऊ-बहिणींना करिअरमध्ये यश मिळू शकते. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवनही आनंदी राहिल.

मकर

घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. करिअरच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. नात्यातील अडचणी संवादातून सोडवा. अनावश्यक खर्च आणि नवीन गुंतवणुकीचे निर्णय टाळा.

कुंभ

व्यावसायिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. कामाचे नियोजन करून महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे लक्ष द्या. नात्यात मतभेद होऊ शकतात. खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना सावधगिरी बाळगा.

मीन

आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. घरातील लहान भाऊ-बहिणींबाबत शुभ वार्ता कळेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळू शकते. वैवाहिक जीवनातही आनंद आणि समाधान राहिल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा