AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashi Bhavishya 18 October 2026 : ‘या’ राशींच्या आयुष्यात आनंदाची चाहूल; मेष ते मीन, वाचा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope Today 18 October 2026: आजचा दिवस काही राशींच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे, तर काहींना महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहावे लागेल. जाणून घ्या, मेष ते मीन या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.

Rashi Bhavishya 18 October 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आनंदाची चाहूल; मेष ते मीन, वाचा संपूर्ण राशिभविष्य
| Edited By: | Updated on: Oct 17, 2026 | 9:59 PM
Share

आज रविवार, 18 ऑक्टोबर रोजी ग्रह-नक्षत्रांची स्थिती काही राशींसाठी अनुकूल ठरणार आहे. काही राशींच्या व्यक्तींना रखडलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची, तर काहींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध, कौटुंबिक जीवन, करिअर आणि आर्थिक स्थितीच्या दृष्टीने हा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या मेष ते मीन या सर्व १२ राशींचे भविष्य.

मेष

क्रिएटिव्ह कामांमध्ये यश मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकते. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. नात्यात गोडवा वाढेल. आत्मविश्वासात वाढ होऊ शकते.

वृषभ

अधिक मेहनत करावी लागेल. त्याचे परिणाम अनुकूल मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील. नात्यात मोकळेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल.

मिथुन

नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याचा फायदा मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहारांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्यात सुधारणा होऊ शकते.

कर्क

नवीन कल्पना आणि योजना फायदेशीर ठरू शकतात. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. मित्र आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. प्रेमजीवन चांगले राहू शकते. मानसिकदृष्ट्या शांतता आणि समाधान जाणवेल.

सिंह

जबाबदाऱ्या वाढून त्या योग्य प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या

संवाद कौशल्य आणि विचार करण्याची पद्धत प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होईल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

तूळ

शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील आणि मन प्रसन्न राहिल.

वृश्चिक

खर्चात वाढ होऊ शकते. बजेटचे योग्य नियोजन करा. कामाच्या ठिकाणी ताण जाणवू शकतो. मेहनतीचे फळ मिळू शकते. उत्तम आरोग्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या.

धनु

नात्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. भागीदारीच्या कामांमध्ये लाभ होऊ शकतो. नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती सामान्य पेक्षा चांगली राहिल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा.

मकर

मान-सन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. प्रभावशाली व्यक्तींशी होणारी भेट फायदेशीर ठरू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. उत्साह आणि आत्मविश्वासही चांगला राहिल.

कुंभ

भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी संयम आणि समजूतदारपणे काम करा. कुटुंबातील एखाद्या विषयावर चर्चा किंवा चिंता निर्माण होईल. मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मीन

आत्मविश्वास मजबूत राहिल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे आणि नेतृत्वगुणांचे कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांना भविष्यात फायदेशीर ठरेल अशी नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळा. राग आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट