
Surya Grahan 2024 Date/Time : प्रत्येक वर्षी भारतासहीत जगात हजारो लोक अंतराळात होणाऱ्या खगोलीय घटनांचे साक्षीदार बनत असतात. त्यापैकीच एक म्हणजे सूर्य ग्रहण आहे. सूर्य ग्रहणाची प्रत्येकाला उत्सुकता असते. तेव्हा चंद्र आपल्या प्रकाशाने सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो, त्यावेळी सूर्य ग्रहण होतं. देशापासून विदेशातील हजारो लोक सूर्य ग्रहण पाहतात. दर वर्षीय हा अद्भभूत खगोलीय नजारा पाहण्यासाठी लोक वाट पाहत असतात. त्यामुळेच आता नव्या वर्षात म्हणजे 2025मध्ये सूर्य ग्रहण कधी आणि कुठे दिसेल याची माहिती जाणून घेणार आहोत.
2025मध्ये एकूण चार ग्रहण दिसणार आहेत. यात दोन चंद्र ग्रहण असतील तर दोन सूर्य ग्रहण असणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात अनेक कामे करण्यास मनाई करण्यात आली आहे. शेवटचं सूर्य ग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी लागलं होतं. हे सूर्य ग्रहण भारतात दिसलं नव्हतं.
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीमधून जात असतो, तेव्हा सूर्य ग्रहण होतं. चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जात असताना सूर्याचा चेहरा पूर्णपणे झाकला जातो. त्यामुळे आकाश काळंकुट्ट होतं आणि दिवसही संध्याकाळ सारखा वाटू लागतो. ग्रहण दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे पूर्ण ग्रहण आणि दुसरं म्हणजे आंशिक ग्रहण.
2025चं पहिलं सूर्य ग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे. 29 मार्च 2025मध्ये हे सूर्य ग्रहण लागेल. हे आंशिक सूर्य ग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार 2.20 मिनिटाने हे सूर्य ग्रहण सुरू होईल. आणि 6 वाजून 13 मिनिटाने लागेल. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. बरमुडा, बारबाडोस, ऑस्ट्रिया, बेल्झियम, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे, जर्मनी, फ्रान्स, हंगेरी, आयर्लंड, मोरक्को, ग्रीनलँड, पूर्व कॅनडा, उत्तर ब्राझिल, हॉलंड, पोर्तुगाल, उत्तर रशिया, स्पेन, स्वीडन, पोलंड, पोर्तुगाल, यूक्रेन, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि पूर्व अमेरिकेत हे सूर्य ग्रहण दिसणार आहे. हे सूर्य ग्रहण आंशिक असल्याने अंधार होणार नाही.
दुसरं सूर्य ग्रहण 2025मध्ये 21 सप्टेंबर रोजी लागणार आहे. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्य ग्रहण न्यूझीलंड, फिजी, अंटार्कटिका, ऑस्ट्रेलियामध्येच पाहिलं जाणार आहे. भारतात हे सूर्य ग्रहण न दिसल्याने त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही. सूतक काळही मान्य होणार नाही. त्यामुळे लोक कोणत्याही टेन्शनशिवाय आपलं काम पूर्ण करू शकतात.
चंद्र जेव्हा सूर्याच्या एका बाजूला झाकतो तेव्हा आंशिक सूर्य ग्रहण होत असतं. आंशिक सूर्य ग्रहणाच्या काळात चंद्राची सावली अम्ब्रा, पृथ्वीवर पडत नाही. केवळ आंशिक सावली पेनम्ब्रा, पृथ्वीवर पडते.