
हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आणि पुराणांचा उल्लेख आहे. पुराणांमध्ये मानवी जीवन आणि इतर गोष्टींचा उलगडा केला गेला आहे. मृत्यूनंतर मानवी आत्म्यासोबत काय होतं याबाबत गरूड पुराणात उल्लेख करण्यात आला आहे. एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गरूड पुराणाचं पारायण केलं जातं. हे पुराण ऐकताना चुकीच्या कृत्यासाठी काही शिक्षांची तरतूद केली आहे. हत्येची अनेक प्रकरण गाजत आहे. काही आरोपींना पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहे. पण शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सदर व्यक्ती तुरुंगातून बाहेर येऊन सामान्य जीवन जगतात. पण गरूड पुराणात अशा कृत्यासाठी नरकयातना भोगाव्या लागतात. नकरातील यातना, शिक्षा आणि नरकातील लोकांबाबत अनेक प्रकार सांगितले गेले आहेत. गरूड पुराणानुसार, व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरकात स्थान मिळतं. वाईट कर्म करणाऱ्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. गरूड पुराणात एकूण 36 नरक सांगितले गेले आहे. यात वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात. चला जाणून घेऊयात निर्दोष व्यक्तीची हत्या केल्यानंतर गरुड पुराणात काय शिक्षा सांगितली गेली आहे.
गरूड पुराणात निर्दोष व्यक्तीची हत्या करणं मोठं पाप मानलं गेलं आहे. यासाठी गरूड पुराणात कठोर शिक्षा सांगितली गेली आहे. हत्या करणाऱ्या व्यक्तीला गरम तेलात टाकून तळलं जातं. गरूड पुराणानुसार, कोणत्याही निर्दोष व्यक्तीची हत्या केल्यानंतर वेगवेगळ्या नरकात पाठवलं जातं. यात रौरव, कुम्भीपाक, ताल आणि अविची हे प्रमुख नरक आहेत. गरूड पुराणात ब्राह्मणाची हत्या केल्यानंतर आत्म्याला कुम्भीपाक नरकात पाठवलं जातं. येथे आगीने धकधकत्या रेतीत फेकलं जातं. क्षत्रिय आणि वैश्याची हत्या केल्यानंतर ताल नरकात पाठवलं जातं.
गरुड पुराणानुसार कुम्भीपाक नरकात गरम तेलात तळलं जातं. यात कोणाची संपत्ती हडपली किंवा ब्राह्मणाची हत्या केली असेल तर पाठवलं जातं. रौरव नरकात खोटी साक्ष दिलेल्या व्यक्तीला पाठवलं जातं. आत्म्याला वेताच्या काठीसारखे ताणले जाते. ताल नकरात क्षत्रिय आणि वैश्य व्यक्तीची हत्या केलेल्या व्यक्तीला पाठवलं जातं. अविची ही नरकातील सर्वात कठोर शिक्षा मानली जाते. यात खोटं बोलणं, खोटी शपथ घेणं आणि खोटी साक्ष देण्यासाठी पाठवलं जातं. गरूड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्मा यमराजाच्या दरबारात जाते. तिथे प्रत्येक पापाचा हिशेब केला जातो. तसेच त्याच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)