तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून ‘बूट’ द्यायचे आहेत का? पण धार्मिक श्रद्धेनुसार ते शुभ आहे की अशुभ?

कोणाला गिफ्ट म्हणून बूट देणे शुभ मानलं जात की अशुभ, याबद्दल अनेकदा संभ्रम असतो. काही संस्कृतींमध्ये ते अशुभ मानले जाते, तर काही ठिकाणी प्रगतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे बूट गिफ्ट म्हणून देणे कोणत्या प्रसंगांमध्ये शुभ मानले जाते आणि कोणत्या प्रसंगांमध्ये अशुभ? हे जाणून घेऊयात.

तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून बूट द्यायचे आहेत का? पण धार्मिक श्रद्धेनुसार ते शुभ आहे की अशुभ?
According to religious beliefs and traditions, is giving shoes as a gift considered auspicious or inauspicious
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 17, 2025 | 1:00 PM

कोणत्याही आनंदाच्या क्षणी आपण आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देण्यात एक वेगळाच आनंद असतो. गिफ्ट घेताना आपण सर्वात आधी त्याची किंमत पाहतो. त्यानंतर त्या वस्तूची क्वालिटी पाहतो. तसेच ते गिफ्ट समोरच्या व्यक्तीला कसे वाटेल, ते उपयुक्त ठरेल का? त्याला ते आवडेल का याचा विचार करतो. पण गिफ्ट करताना अशा काही वस्तू असतात ज्या कधीही देऊ नयेत असे म्हटले जाते. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आवर्जून दिल्या जातात. भेटवस्तू देण्यामागेही शुभ किंवा अशुभ शकुन मानले जातात. विशेषतः जेव्हा कोणाला बूट हे गिफ्ट म्हणून देण्याचा विचार येतो तेव्हा त्याबद्दल असलेल्या मान्यतांबद्दल बरेच लोक गोंधळून जातात.

कारण बूट भेट देणे हे उपयुक्तता आणि सोयीचे प्रतीक मानले असले तरी देखील तर काही संस्कृतींमध्ये अशुभ मानले जाते. म्हणूनच बूट किंवा सॅन्डल वैगरे देण्याचा जेव्हा लोक विचार करतात. तेव्हा ते अशुभ ठरेल की शुभ या संभ्रमात असतात. तर जाणून घेऊयात की एखाद्या जर तुम्हाला गिफ्ट म्हणून ‘बूट’ द्यायचे असतील तर ते शुभ ठरेल की अशुभ?

प्रेमाणे अन् चांगल्या भावनेने दिलेली भेटवस्तू

प्रेम आणि आदराने दिलेली कोणतीही भेटवस्तू शुभ मानली जाते. जर भावना सकारात्मक असेल तर गिफ्ट म्हणून बूट देणे अशुभ मानले जात नाही. पण ते गिफ्ट कोणती व्यक्ती देत आहे आणि कोणत्या भावनेनं देत आहे हे मात्र नक्कीच महत्त्वाचे ठरते.

शुभेच्छांच्या बदल्यात एक नाणे द्या

असे मानले जाते की जर बूट देणाऱ्या व्यक्तीने एखादं नाणे किंवा पैसे दिले तर भेटवस्तू विक्रीत बदलते आणि त्यामागे असलेला अशुभ शकुनही संपतो.

कामाच्या ठिकाणी बूट भेट देणे फायदेशीर आहे

व्यावसायिक जीवनात म्हणजे ऑफिसमध्ये बूट भेटवस्तू मिळणे हे प्रगती होण्याचे प्रतीक मानले जाते. या परिस्थितीत हे गिफ्ट शुभ मानले जाते.

अनेक संस्कृतींमध्ये शुभ चिन्हे

पाश्चात्य देशांमध्ये, बूट हे भाग्य वाढीचे लक्षण मानले जाते. तसेच आयुष्यात येणाऱ्या चांगल्या प्रवासाचे प्रतीक मानले जातात आणि बूट देणे हे नशिबाशी संबंधित असते अशी त्यांची धारणा आहे.

या समारंभात गिफ्ट म्हणून बूट देणे शुभ 

अनेक कुटुंबे लग्न, टिळा समारंभ आणि सणांमध्ये बूट देणे शुभ मानतात.