
वास्तूशास्त्रात घरातील प्रत्येक कोपऱ्याच महत्त्व सांगितलेलं आहे. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाक घराबद्दल बऱ्याच गोष्टी वास्तूशास्त्रात सांगितलेल्या आहेत. घरातील स्वयंपाकघर हा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये देवी अन्नपूर्णा वास करते असे मानले जाते. वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या स्वयंपाकघरात उलट्या ठेवू नयेत असं म्हटलं जातं. अन्यथा तुम्हाला नकारात्रिणाम मिळू शकतात. चला याबद्दल जाणून घेऊयात.
चाकू किंवा यासारख्या कोणतीही तीक्ष्ण वस्तू
वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की स्वयंपाकघरात चाकू किंवा यासारख्या कोणतीही तीक्ष्ण वस्तू उलट्या किंवा उपड्या ठेवू नयेत. अन्यथा, तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं. यामुळे वास्तुदोष वाढतात आणि घरात भांडणे देखील होऊ शकतात.
तवा उलटा ठेवू नका
वास्तुशास्त्रात चपाती किंवा रोटी बनवल्यानंतर पॅन किंव तवा कधीही उलटा ठेवू नये. असे केल्यास त्या व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तुमचे कर्ज वाढू शकते आणि त्या व्यक्तीला गरिबीला सामोरे जावे लागू शकते.
कढई उलटी ठेवू नये
वास्तुशास्त्रात तव्यासोबतच स्वयंपाकघरात कढई देखील उलटी ठेवू नये असे म्हटले जाते. जर तुम्ही नकळत असे केले तर त्या व्यक्तीला घरात नकारात्मक उर्जेचा सामना करावा लागू शकतो.
भांडी उलटे न ठेवण्याचे कारण
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवू नयेत. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या घरात गंभीर वास्तुदोष निर्माण होतात, ज्याचा नकारात्मक प्रभाव घरातील प्रत्येक सदस्यावर दिसून येतो. स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते आणि नेहमी कलहाची परिस्थिती असते.
गॅस स्टोव्ह कुठे ठेवावा
वास्तुशास्त्रात सर्वकाही योग्य दिशेने ठेवण्याची पद्धत देखील सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आग्नेय दिशेला गॅस ठेवावा आणि अन्न शिजवावे. स्टोव्ह किंवा गॅस देखील या दिशेने ठेवणे योग्य मानले जाते. जर तुम्ही ते उत्तर किंवा पश्चिम दिशेने ठेवले तर त्याचा आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
स्वयंपाकघरात बसून कधीही अन्न खाऊ नये.
वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, स्वयंपाकघरात बसून कधीही अन्न खाऊ नये. स्वयंपाकघरात बसून जेवणे शुभ मानले जात नाहीत. तसेच, स्वयंपाकघरासमोर कधीही बाथरूम असू नये. यामुळे वास्तुदोषा निर्माण होऊ शकतो. जो नंतर त्रासाचे कारण बनतो. तसेच स्वयंपाकघरात खराब नळ म्हणजे ज्यातून सतत पाणी टपकत असा नळ नसावा. अन्यथा ते वास्तुदोषाचे कारण बनू शकते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )