
घराच्याबाबतीत वास्तु टिप्सचे पालन केल्याने आयुष्यात, घरात अनेक सकारात्मक परिणाम मिळू शकतात. त्यातीलच एक म्हणजे प्रत्येकाच्या घरात असणारा आरसा. आरसा हा प्रत्येकाच्या घरात असतो. पण अनेकांना त्याच्याबद्दलच्या वास्तू टीप्स किंवा नियम माहित नसतील. कारण आरसा ही एक फक्त वस्तू नसून घरातील ऊर्जा बदणारी गोष्ट आहे. त्यासाठी वास्तू तत्वांचे पालन करणे फार गरजेचे आहे.
त्यामुळे घरात नेमक्या कोणत्या ठिकाणी आरसा ठेवावा हे माहित नसल्याने घरात बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी त्याची योग्य दिशा माहित असणे गरजेचे आहे. चला मग याबद्दल जाणून घेऊयात.
आरसा कुठे लावावा?
वास्तुशास्त्रात घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावणे योग्य मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही खिडक्या किंवा बाल्कनीजवळही आरसे ठेवू शकता. वास्तुनुसार, घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला कधीही आरसे लावू नयेत, कारण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
इथे आरसा लावू नका
वास्तुशास्त्राच्या तत्वांनुसार , बेडरूममध्ये आरसा अशा प्रकारे लावावा की जेथे बेडचे प्रतिबिंब पडणार नाहीत. कारण यामुळे वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शिवाय, स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नये कारण वास्तुशास्त्र असे मानते की यामुळे घरगुती कलह निर्माण होतात.
तसेच वास्तुशास्त्रानुसार आरसे कधीही बेड किंवा दाराच्या समोर थेट लावू नयेत, कारण असे केल्याने सकारात्मक ऊर्जेला घरात येण्यास अडचणी येतात आणि निघून जाते.
आरशाबाबत या चुका करू नका
वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेला किंवा धुरकट झालेला आरसा ठेवू नये. यामुळे दुर्दैव येते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, ज्यामुळे अशांततेचे वातावरण निर्माण होते. या नियमांचे पालन न केल्यास आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून,आरसा नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवावा. त्याला वेळोवेळी स्वच्छ करत राहावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)