AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा ही खास चांदीची वस्तू, घरावर होईल धनाचा वर्षाव

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधील मोठा सण आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करावं असं मानलं जातं. मात्र ज्यांचं बजेट कमी आहे, असे लोक या दिवशी चांदीच्या काही विशिष्ट वस्तू देखील खरेदी करू शकतात. त्यामुळे घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा ही खास चांदीची वस्तू, घरावर होईल धनाचा वर्षाव
Akshaya TritiyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 18, 2026 | 10:03 PM
Share

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधील एक मोठा सण आहे. या दिवशी सोन्याची एखादी वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जर एखादी वस्तू खरेदी केली तर ती भविष्यात तुम्हाला खूप लाभदायक ठरते, त्यामुळे अनेकजण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी करतात. अक्षय तृतीयेचा अर्थ कधीही न संपणारं अक्षय असा होतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी केली तर वर्षभर तुमच्या घरात धनाची आवक होते, असं मानलं जातं. मात्र सध्या सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सर्वांनाच सोन्याची खरेदी शक्य होईल असं नाही. त्यामुळे वास्तुशास्त्रात यावर देखील एक उपाय सांगण्यात आला आहे. तुम्ही या दिवशी सोन्याऐवजी चांदीची देखील खरेदी करू शकता. या दिवशी चांदीची खरेदी करणं देखील शुभ मानलं गेलं आहे. कारण चांदीचा संबंध हा चंद्राशी आहे. चंद्राला मनाची शांती, स्थिरता आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्ही चांदीची खरेदी करू शकता.

चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात?

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही अक्षय तृतियेच्या दिवशी चांदीच्या नाण्यांची खरेदी करू शकता. ज्या नाण्यांवर गणपती आणि लक्ष्मी माता यांचे फोटो आहेत. किंवा ज्या चांदीच्या नाण्यावर कुबेराचा फोटो आहे, अशा चांदीच्या नाण्याची या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं गेलं आहे. यामुळे तुमच्या घराला बरकत प्राप्त होते. सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. आणि तुमच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहतो. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर यावर देखील हा प्रभावी उपाय असल्याचं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

चांदीच्या नाण्याचा उपाय

वास्तुशास्त्रामध्ये चांदीच्या नाण्याचा सोपा उपाय सांगण्यात आला आहे, जो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या नाण्यावर भगवान गणेश किंवा लक्ष्मी मातेचा फोटो आहे, असं नाणं खरेदी करा. त्यानंतर सायंकाळच्यावेळी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची मनोभावे पूजा करा, त्यावेळी हे नाणं भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवा. पूजा झाल्यानंतर या नाण्याला पिवळ्या किंवा लाल वस्त्रामध्ये बांधा आणि हे नाणं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. आयुष्यात तुम्हाला कधीही पैशांची कमी भासणार नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद.

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं.

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..